Video | भरधाव वेगात दुचाकी, थेट दुभाजकावर आदळल्याने दोघांचाही मृत्यू, थरकाप उडवणारा अपघात कॅमेऱ्यात कैद
पिंपरी चिंचवड येथे अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाता आकुर्डीयेथे भरधाव वेगात आलेली दुचाकी दुभाजकावर थेट धडकली आहे. या अपघातात दुचाकीवर स्वार असलेला तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन दुचाकीस्वार तरुणी जखमी झाल्या आहेत.
पुणे : पिंपरी चिंचवड येथे अंगाचा थरकाप उडवणारा एक अपघात झाला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाताना आकुर्डी येथे भरधाव वेगात आलेली दुचाकी दुभाजकावर थेट धडकली आहे. या अपघातात दुचाकीवर स्वार असलेल्या आर्यन परमार आणि श्वेता गजबे यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन दुचाकीस्वार तरुणी जखमी झाल्या आहेत.
नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या दुभाजकावर थेट आदळले
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आकुर्डी येते झाला. अपघात झालेल्या दुचाकीवर एक तरुण आणि तरुणी प्रवास करत होते. ही दुचाकी भरधाव वेगात जात होती. यावेळी नियंत्रण सुटल्यामुळे दोघेही रस्त्याच्या दुभाजकावर थेट आदळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीनेही थेट पेट घेतला. आर्यन परमार आणि श्वेता गजबे असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
पाहा व्हिडीओ :
इतर दोन मुली जखमी
दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणीही जखमी झालेल्या आहेत.
नाशिकमध्ये थरारक अपघात
तर दुसरीकडे दसऱ्याच्या दिवशी मुलीला सासरी भेटून परतणाऱ्या वडिलांचा कारने दिलेल्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला होता. रंगनाथ खालकर असे मृताचे नाव होते, तर त्यांच्या गंभीर जखमी मेहुण्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते . हिंगणवेढे परिसरात 15 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.
कार चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली
मिळालेल्या माहितीनुसार महादू काळू टिळे आणि रंगनाथ मुरलीधर खालकर हे दुचाकीवरून आज शुक्रवारी दसऱ्यादिवशी मुलीला तिच्या सासरी भेटायला गेले होते. खालकर यांनी आपल्या मुलीची भेट घेतली आणि ते गावी निघाले होते. त्यांची दुचाकी (एम.एच. 15 एफ.जी. 3711) हिंगणवेढे येथून जात होती. त्यांच्या समोरून एक कार येत होती. कार कोटमगावडे जात होती. या कार (एम. एच. 15 ए. एच. 4175) चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली होती. स्पार्किंगमुळे दुचाकीने पेट घेतला होता.
दुचाकी जागीच जळून खाक
ही दुचाकी जागीच जळून खाक झाली. दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी खालकर यांना तपासून मृत घोषित केले होते. अपघातानंतर कार चालकाने पलायन केले होते. याबाबती पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
इतर बातम्या :
VIDEO | दहशतवादी लपलेले घरच भारतीय लष्कराने उडवले, इमारत झाली बेचिराख
लाच घेणाऱ्या ऐवजी थेट लाच देणाऱ्यालाच अटक, भंडाऱ्यात पोलिसाला लाच देणाऱ्या दोघांना बेड्या
सत्तेच्या लालसेपोटी दत्तक मुलाशीही अनैतिक संबंध, ‘राणी चिंग शी’ची थक्क करणारी कहाणी
(pimpri chinchwad young boy and girl died in bike accident incident caught in cctv camera)