Pimpri Chinchwad | पिंपरी महापालिकेच्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीचे काम पूर्ण ; आता उत्सुकता…

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारुप प्रभागरचनेवरील हरकतींवर प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी झाली. सुनावणीनंतर आवश्‍यक शिफारशींसह अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने सादर केला आहे. त्यामुळे आता अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर कधी होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pimpri Chinchwad | पिंपरी महापालिकेच्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीचे काम पूर्ण ; आता उत्सुकता...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 11:19 AM

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation)निवडणूकसाठीच्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीचे काम पूर्ण झाले आहे. प्रभागरचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission)मान्यता मिळाल्यानंतर ही प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या (Voter lists) तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले होते. त्यासाठी पिंपरी,चिंचवड,भोसरी विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या मूळ याद्या व पुरवणी यादी वापरून कामकाज करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांना मतदार यादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.एका कर्मचार्‍यास मतदार यादीच्या सहा भागांची जबाबदारी होती. त्यानुसार कर्मचार्‍यांनी नवीन प्रभागात त्या-त्या मतदारांची नावे आहेत की नाही हे तपासले. त्यांच्या नोंदी निवडणूक आयोगाने दिलेल्या कंट्रोल चार्ट तसेच, एमएस एक्सेलमध्ये भरण्यात आल्या. ते काम पूर्ण झाले आहे.

आरक्षण काय लागणार?

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारुप प्रभागरचनेवरील हरकतींवर प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी झाली. सुनावणीनंतर आवश्‍यक शिफारशींसह अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने सादर केला आहे. त्यामुळे आता अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर कधी होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेची प्रारूप रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. 14 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत यावर 5 हजार 684 हरकती प्राप्त झाल्या. या हरकतींवर 25 फेब्रुवारी रोजी प्राधिकृत अधिकारी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी कवडे यांच्या शिफारशीसह अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाने आयोगाला सादर केला.

Numerology | मेरा वचन ही है मेरा शासन , बाहुबलीसारखे दृढनिश्चय असतात शुभांक 2 चे लोक, तुमचा शुभांक कोणता ?

Virat Kohli 100th Test: विराटसाठी आता नाही, तर पुन्हा कधीच नाही, मोहालीच्या 100 व्या टेस्टचं 71 नंबरशी खास कनेक्शन

42 वर्षीय महिला राहत्या घरी मृतावस्थेत, मुलगा म्हणतो आईसोबत राहणाऱ्या पार्टनरने तिला संपवलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.