माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले आहेत.

माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 1:48 PM

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले आहेत.

माझा माजी मंत्री म्हणून उल्लेख करु नका, चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने राजकारणात उलट सुलट चर्चा

पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव मधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत पाटलांनी दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.

चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे मात्र राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसंच पाटील यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलंय. पाटील यांच्या बोलण्याच्या नेमका काय अर्थ असावा, याचे राजकीय कंगोरे उलगण्याचा बरेच जण प्रयत्न करत आहेत.

देहूत एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडत होते. तेव्हा मंचावरील व्यक्ती वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होती. तेव्हा ते पाटलांना माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल,असं सूचक विधान करून चर्चेला उधाण आणलंय.

खेडेकरांच्या ऑफरवर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangh) संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी भाजपशी (BJP) युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. कारण स्थापनेपासून आजपर्यंत केवळ आणि केवळ संघ-भाजप रडारवर असताना, पुरुषोत्तम खेडेकर यांनी थेट भाजपशी युती करण्याचं भाष्य केल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल”

चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना संभाजी ब्रिगेडच्या बदलत्या भूमिकेवर भाष्य केलं. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकाच्या संपादकीयमध्ये लेख लिहिला आहे. खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. पण आम्ही अद्याप कोणताही निर्णयापर्यंत आलेलो नाही. खेडेकरांची नेमकी ऑफर काय आहे ते पाहू. चर्चा करु, त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

(please Dont call me Ex Minister Says BJP Chandrakant patil)

हे ही वाचा :

पुरुषोत्तम खेडेकरांची ऑफर आधी बघू, संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.