अदानी यांच्या मागे मोदी नावाची शक्ती आहे काय?; ‘त्या’ घोषणेनंतर संजय राऊत यांचा सवाल

किती वेळा त्याच त्या गोष्टी सांगणार? काँग्रेसने आणीबाणी आणली म्हणून तुम्ही आणणार आहात का? काँग्रेसने सरकारे पाडली म्हणून तुम्ही पाडणार आहात का? तुमचं काय ते बोला.

अदानी यांच्या मागे मोदी नावाची शक्ती आहे काय?; 'त्या' घोषणेनंतर संजय राऊत यांचा सवाल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 11:51 AM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: अदानी समूहाच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी गेल्या दोन दिवसांपासून संसद दणाणून सोडली आहे. अदानी घोटाळ्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी विरोधक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण केलं. पण त्यात त्यांनी अदानी घोटाळ्याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे विरोधक अधिकच संतापले. विरोधकांनी दोन्ही सभागृहात मोदी यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला. आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. अदानीच्या मागे मोदी नावाची शक्ती आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

अदानी मुद्द्यावरून मोदी मौन आहेत. ते उत्तरं देत नाहीत. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात पंतप्रधानांसमोर गोंधळ घातला. त्यांचं भाषण होऊ दिलं नाही. पण पंतप्रधान बोलतच होते. विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केले. त्यावर मोदींनी उत्तर का दिलं नाही? राहुल गांधींसह विरोधकांनी प्रश्न सोपे विचारले होते. प्रश्नपत्रिका सोपी होती. त्याचे उत्तर का दिलं नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

भाजप एक्सपोज होतेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू होतं. त्यावेळी अदानीच्या मागे कोणती शक्ती आहे? असा सवाल विरोधकांनी केला. तेव्हा सत्ताधारी बाकावरून मोदी मोदी गर्जना होत होत्या. त्यामुळे अदानी नावामागे मोदी ही शक्ती आहे का? म्हणजे ते आपोआपच एक्सपोज होत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.

मोदी कठिण प्रश्नांची उत्तरे देतात

राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला की, किती वेळा मोदी आणि अदानी परदेशात गेले? त्याचं उत्तर सोपं होतं. मोदी उत्तर देऊ शकले असते. त्यांनी उत्तर द्यायला हवं होतं. सोपं उत्तर होतं. मोदी कठीण प्रश्नांची उत्तरे देत असतात. जी उत्तरं सुटतात त्याचीच उत्तरे देतात, असा चिमटा त्यांनी काढला.

तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात

अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी, ही विरोधकांची मागणी आहे. आमचीही तीच मागणी आहे. अदानी संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर द्यावे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही एका पक्षाचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

किती वेळा तेच ते बोलणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस काळातील कारभारावर बोलत होते. त्यावरही राऊत यांनी टीका केली. किती वेळा त्याच त्या गोष्टी सांगणार? काँग्रेसने आणीबाणी आणली म्हणून तुम्ही आणणार आहात का? काँग्रेसने सरकारे पाडली म्हणून तुम्ही पाडणार आहात का? तुमचं काय ते बोला. इतरांचं काय बोलता? असा सवाल त्यांनी केला.

बच्चू कडू प्रवेश करणार आहेत काय?

येत्या काळात महाविकास आघाडीचे 15-20 आमदार भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला होता. त्यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. बच्चू कडू हे स्वत: भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का? बहुतेक भाजपचे आमदार प्रवेश करणार असतील. बच्चू कडू बोलतात ते बरोबर आहे, असा टोला त्यांनी लगावला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.