Pune Crime : पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील चोरी प्रकरणात एका सराईत गुन्हेगारासह दोन आरोपींना अटक, 30 लाखांचे दागिने जप्त!
या घरफोडीमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुश्तफा शकील अन्सारी, जुनेद रिझवान सैफ, हैदर कल्लु शेख अशी आहेत. या आरोपींनी बिबवेवाडीतील सोबा सवेरा अपार्टमेंटमध्ये 20 जूनला दिवसा घरफोडी करून दीड लाखांची रोकड आणि 60 तोळ्यांचे दागिने चोरून नेले होते.
पुणे : पुण्यातील (Pune) बिबवेवाडी परिसरामध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत दिवसा मोठी घरफोडी करण्यात आली होती. या घरफोडीत तब्बल 30 लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. आता बिबवेवाडी पोलीस (Police) आणि गुन्हे शाखेच्या युनीट एकने याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक (Arrested) केली आहे. तसेच या आरोपीला दागिने लपविण्यासाठी मदत करणाऱ्या दोन साथीदारांनीही जेरबंद करण्यात आलंय. या आरोपींकडून सर्व ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतीयं.
बिबवेवाडीतील सोबा सवेरा अपार्टमेंटमध्ये चोरी
या घरफोडीमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुश्तफा शकील अन्सारी, जुनेद रिझवान सैफ, हैदर कल्लु शेख अशी आहेत. या आरोपींनी बिबवेवाडीतील सोबा सवेरा अपार्टमेंटमध्ये 20 जूनला दिवसा घरफोडी करून दीड लाखांची रोकड आणि 60 तोळ्यांचे दागिने चोरून नेले होते. या चोरट्यांनी गॅलरीचे लोखंडी ग्रील वाकवून घरात प्रवेश करून ऐवज चोरून नेला होता. दिवसा सोसायटीमध्ये चोरी झाल्याने परिसरामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
चोरीचे दागिने लवपण्यास मदत केलेल्या दोन जणांना केली अटक
याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून फिंगरप्रिंट विभागाची मदत घेतली. त्यावेळी सराईत गुन्हेगार मुश्तफा याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी दागिने लपवण्यासाठी आरोपीने दोन साथीदारांची मदत घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चोरीचे दागिने लवपण्यास मदत केलेल्या दोन साथीदारांना देखील ताब्यात घेतले आहे. यासंदर्भातील पुढील तपास सध्या पोलिस करत आहेत. मुश्तफा हा एक सराईत गुन्हेगार आहे.