पर्यटनासाठी जातायं, पण सावध व्हा, स्टंटबाजी केल्यास पर्यटनाऐवजी मिळेल पोलीस ठाण्याची हवा

lonavala bhushi dam : पुणे, मुंबईसह लोणावळा - खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच धोर धरला आहे. यामुळे वर्षाविहार करण्यासाठी अनेक जण बाहेर पडत आहे. परंतु पर्यटनास जाताना काळजी घ्या, कारण पोलिसांनी प्लॅनच तयार केला आहे.

पर्यटनासाठी जातायं, पण सावध व्हा, स्टंटबाजी केल्यास पर्यटनाऐवजी मिळेल पोलीस ठाण्याची हवा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 10:10 AM

रणजित जाधव, लोणावळा : पाऊस पडू लागला की मुंबई अन् पुणेकरांचा वीकेंड लोणावळा, खंडाळा, माथेरानमध्ये साजरा होतो. अनेक जण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीला जातात. त्या ठिकाणी अशोका धबधब्याचा आनंद घेतात. गेल्या आठ दहा दिवसांपासून पुणे, मुंबई परिसरात पाऊस पडत आहे. यामुळे शनिवार, रविवारची सुटी साजरी करण्यासाठी मुंबई, पुणेकर लोणावळासह इतर पर्यटनस्थळी जात आहेत. मागील रविवार लोहगडावर वर्षाविहार करण्यासाठी अनेक जण आले होते. त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. पर्यटक अडकून पडले होते. यामुळे पर्यटनस्थळी जाताना नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस सरसावले आहे.

लोणावळ्यात काय करणार पोलीस

लोणावळ्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. या ठिकाणी स्टंटबाजी करणाऱ्यांची खैर नाही. मग लोणावळ्यातील वर्षाविहाराऐवजी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसण्याचा आनंद घ्यावा लागू शकतो. पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद शांतपणे घ्यावा. यावेळी हुल्लडबाजी केली तर त्यांची खैर नसणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आता पर्यटनस्थळी आणि परिसरात साध्या वेशात पोलीस असणार आहे. या ठिकाणी पोलिसांची नजर तुमच्यावर असणार आहे.

का घेतला निर्णय

लोणावळा येथे येणारे अनेक पर्यटक स्टंटबाजी करताना आढळतात. भुशी धरण, धबधबे अशा ठिकाणी पर्यटक स्वतःचे जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अनेक वेळा अपघात झाल्याचा प्रसंग समोर आला आहे. काही व्यक्ती चारचाकी वाहनांतून प्रवास करताना विविध चाळे करतात. या सर्व उपद्व्याप करणाऱ्या पर्यटकांना आता शिक्षा होणार आहे. वर्षाविहाराऐवजी थेट पोलीस स्टेशनमध्ये बसून आनंद घ्यावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना केला हा बदल

लोणावळा येथे लोहगडावर जाताना वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी मार्ग काढला आहे. पोलिसांनी कार्ला फाटा ते लोहगड या मार्गासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. लोहागडावर जाणाऱ्या पर्यटकांना गडावरुन परत येताना मळवली- देवले या मार्गाचा वापर करावा, लागणार आहे. यासाठी पोलीस मित्र संघटना तसेच पोलीस कर्मचारी लक्ष देणार आहे. तसेच त्यांना स्थानिक ग्रामस्थही मदत करणार आहे.

हे ही वाचा

लोणावळा लोहगडावरील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी सांगितला हा उपाय

लोणावळा येथील भुशी डॅम ओव्हरफ्लो, पर्यटकांच्या आनंदाला उधाण

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.