टोमॅटोच्या झाडाला लागलेत बटाटे, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारे तंत्रज्ञान
baramati agriculture exhibition | कृषी प्रदर्शनात टोमॅटोच्या झाडाला बटाटे लावले झाड आले आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक शेती तंत्रज्ञानाने टोमॅटोचे पीक विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे.
बारामती, पुणे, दि.21 जानेवारी 2024 | शेतकऱ्यांसाठी नवनवीन संशोधन कृषी विद्यापीठे आणि कृषी शास्त्रांकडून होत असते. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या फायदा व्हावा, देशातील अन्नधान्य उत्पादन वाढावे, हा उद्देश असतो. नवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती करुन देण्यासाठी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन सुरु आहे. या कृषी प्रदर्शनात राज्यभरातील शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. कृषी प्रदर्शनात टोमॅटोच्या झाडाला बटाटे लावले झाड आले आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक शेती तंत्रज्ञानाने टोमॅटोचे पीक विकसित करण्यात आले आहे. त्याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. एकाच वेळी एका झाडावर बटाटे आणि टोमॅटो घेता येणार आहे.
“पोमॅटो” पाहण्यासाठी गर्दी
शारदानगरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना राबवण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच नवीन संकल्पना राबवण्यात आली आहे. “पोमॅटो” ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे. “पोमॅटो” म्हणजे पोट्याटो आणि टोमॅटो एकत्र आणणे आहे. टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या पिकाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येत आहे.
टोमॅटोच्या झाडाला वरती टोमॅटो आणि खाली बटाटे, असा प्रयोग हा झाला आहे. यामुळे एकाच ठिकाणी दोन पिकांचे उत्पन्न शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. बारामतीमधील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना हा प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती.
कर्ली पार्सली कोथिंबीर
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहेत. या प्रदर्शनामध्ये परदेशी कोथिंबीरचे यशस्वी पीक घेतले आहे. ही परदेशी कोथिंबीर पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. या कोथिंबीरीचे नाव कर्ली पार्सली असे आहे.