पुण्याकडे ६० भाविकांना घेऊन येणाऱ्या बसचा भीषण अपघात
तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन खासगी बस पुणे शहराकडे परत येते होती. बसमध्ये ६० प्रवाशी होते. बस पुणे-सोलापूर महामार्गावर असताना अचनाक अपघात झाला. चालकाने नियंत्रण गमवल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
पुणे : तुळजापूरवरुन देवदर्शन करून पुणे शहराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसचा अपघात झाला. शनिवारी सकाळी हा अपघात झाला आहे. बसमध्ये ६० भाविक होते. त्यातील ३० जण जखमी झाले आहेत. अपघातात पुणे शहरातील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन ते तीन जण गंभीर जखमी आहेत. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घाव घेत जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले. दौंड तालुक्यातील मळद येथे हा अपघात झाला. मृत महिला पुणे शहरातील रहिवाशी आहे.
जखमींमध्ये लहान मुलेही
तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन खासगी बस पुणे शहराकडे परत येते होती. बसमध्ये ६० प्रवाशी होते. बस पुणे-सोलापूर महामार्गावर असताना मळद गावाजवळ खड्ड्यात उलटली. या अपघातात तीस प्रवासी जखमी झाले. त्यात वृद्ध महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व भाविक हे पुणे शहरातील भवानीपेठ, लोहिया नगर परिसरातील होते. ते खासगी बसने तुळजापूर, येरमाळा येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते.
कसा झाला अपघात
बस पुण्याकडे परतत असताना शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील मालाड घागरेवस्तीजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडच्या मधोमध असलेल्या कल्व्हर्टवर उलटली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना दौंड व भिंगवण (इंदापूर) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीय घाबरले
बसच्या अपघात झाल्याची माहिती भाविकांच्या कुटुंबियापर्यंत पोहचली. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या नातेवाईकांचा समाचार घेत होता. अनेकांचे कुटुंबियांनी पुण्यातून अपघात स्थळाकडे धाव घेतली.