आठ वर्षांपासून फरार आरोपीला CID ने कसे पकडले? ३६७ कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप

pune crime news : पुणे सीआयडी पथकाने गेल्या आठ वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला पकडले आहे. पोलिसांना नेहमी गुंगारा देणारा आरोपी अखेर सापडला आहे. ३६७ कोटी रुपये घोटाळाचा आरोपातील तो आरोपी आहे.

आठ वर्षांपासून फरार आरोपीला CID ने कसे पकडले? ३६७ कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 4:27 PM

अभिजित पोते, पुणे : आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला आरोपी पोलिसांना मिळाला आहे. ३६७ कोटी रुपये घोटाळातील हा आरोपी आहे. या घोटाळयाप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीकडे ७ गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यात तब्बल २६ आरोपींवर न्यायालयात दोषारोप पत्रसुद्धा दाखल झाले आहे. या घोटाळ्यातील पहिला गुन्हा दहिसर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. २०१२ ते २०१५ या कालावधीत हा घोटाळा झाला होता.

काय आहे प्रकरण

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या घोटाळातील हे प्रकरण आहे. ३६७ कोटी रुपये अनुदानात अपहार झाल्याचा आरोप या प्रकरणात आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी अन् महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम गेल्या 8 वर्षापासून कारागृहात आहे. या प्रकरणातील आरोपी कमलाकर रामा ताकवाले हा गेल्या आठ वर्षांपासून फरार होता.

कुठे केली अटक

कमलाकर रामा ताकवाले हा गेली आठ वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. सीआयडीच्या पथकाने त्याला संगमनेर परिसरातून अटक केली. कमलाकर ताकवाले स्वतःचे नाव बदलून अहमदनगर जिल्हयात राहत असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. सीआयडी गेल्या चार महिन्यांपासून त्याचा छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अहमदनगर भागत शोध घेत होती. मग सीआयडीला अहमदनगर जिल्हयातील अकोले आणि संगमनेर तालुक्यात तो स्वतःचे नाव बदलून रहात असल्याची माहिती मिळाली. तसेच स्वत:चे चारचाकी वाहन वापरत असल्याची माहिती सीआयडीला मिळाली.

हे सुद्धा वाचा

असा पकडला गेला

सीआयडी पथकाने त्याचा वाहनाची माहिती काढली. त्या वाहनाच्या फास्ट टॅगच्या माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरु केला. त्याच्यासंदर्भात मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणाच्या करण्यात आले. त्यानंतर तो कमलाकर रामा ताकवाले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला संगमनेर येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.