पुण्यात अजित पवार यांना भाजपचा जोरदार धक्का, गडा आला पण सिंह गेला

APMC Election Result : राज्यातील बाजार समित्यांचे निकाल आले. या निवडणुकीत सत्ताधारी गटाला धक्का बसला. परंतु राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यातील निकाल पक्षाला धक्का देणार ठरला. गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती राष्ट्रवादीची निर्माण झाली.

पुण्यात अजित पवार यांना भाजपचा जोरदार धक्का, गडा आला पण सिंह गेला
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 8:39 AM

पुणे : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत अनेकांचा विजय झाला आहे. तर अनेकांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत धक्का बसलेल्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीची सरसी या निवडणुकीत दिसून आली. परंतु राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुण्यात अजित पवार यांना भाजपने धक्का दिला आहे. पुण्यात गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. अजित पवार यांचे २४ वर्षांपासून वर्चस्व राहिलेल्या बाजार समितीत भाजप पुरस्कृत पॅनल विजयी झाले. यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

कुठे कसे आले निकाल

पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष हवेली बाजार समितीकडे होते. या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. भाजपने राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल तयार केले होते. भाजपच्या या पॅनलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या पॅनलला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. तीन अपक्षांनीही बाजी मारली. हवेली बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व होते.

हे सुद्धा वाचा

गड आला पण सिंह गेला

पुणे जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. परंतु हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. इंदापूर, बारामती, मंचर, नीरा बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आली. यामुळे पुण्यात राष्ट्रवादीचा गड आला पण हवेलीच्या माध्यमातून सिंह गेला अशी परिस्थिती झाली. चा निवडणुकीत उमेदवारी देताना राष्ट्रवादीने आयात उमेदवारांना प्राधान्य दिले. त्यामुळे पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले. राष्ट्रवादीतील सर्व नाराज एकत्र आले. त्यांनी भाजप, शिवसेना ठाकरे गटास मदत केली. यामुळे राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या.

पुण्यात राष्ट्रवादीचे राहिले वर्चस्व

पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर आधी काँग्रेस त्यानंतर गेल्या २४ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २४ वर्षांनंतर झाली. या ठिकाणी १९ वर्षे प्रशासक राज होते. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना झाला. परंतु राष्ट्रवादीला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.