पाहा शिक्षणासाठी मुलांना कशी करावी लागतेय धोकादायक कसरत, थर्माकोलची नाव, सापांशी सामना अन्…

Pune News : देशात मुलांच्या शिक्षणासाठी अनेक योजना आहेत. सहा ते १४ वर्षांच्या मुलांसाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. परंतु गावपातळीवर परिस्थिती वेगळीच आहे. असेच हे एक गाव आहे जेथे...

पाहा शिक्षणासाठी मुलांना कशी करावी लागतेय धोकादायक कसरत, थर्माकोलची नाव, सापांशी सामना अन्...
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 1:01 PM

पुणे | 27 ऑगस्ट 2023 : मुलांच्या शिक्षणास प्राधान्य देणाऱ्या अनेक योजना देशात राबवल्या जात आहेत. शिक्षण हक्क कायदा करुन मुलांना शिक्षणाचा हक्क दिला गेला आहे. मुलांना शाळेत येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी माध्यान भोजन योजना आहे. एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी दुर्गम भागात शाळा उघडल्याचे दावे केले जात आहेत. परंतु त्याचवेळी शाळेत जाण्यासाठी मुलांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पुणे-औरंगाबाद मार्गावरील एका गावात दिसत आहे.

काय आहे त्या गावातील परिस्थिती

औरंगाबाद जिल्ह्यातील धनोरा गाव पुणे-औरंगाबाद महामार्गापासून फक्त पाच किलोमीटरवर आहे. जायकवाडी प्रकल्पामुळे हे गाव दोन भागात विभागले गेले. गावात दुसऱ्या भागात शाळा आहे. यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी मुलांना नावेतून प्रवास करावा लागतो. मुलांकडे नाव नाही. मग थर्माकोलची नाव त्यांच्या पालकांनी बनवली. तिचा वापर करुन मुले शाळेत जातात. परंतु त्यांचे आव्हान येथेच संपत नाही. पाण्यात विषारी सापही असतात. त्यांना दूर करण्यासाठी आम्हाला नेहमी काठीचा वापर करावा लागत असल्याचे अकरा वर्षीची प्राजक्ता काळे हिने सांगितले.

हे सुद्धा वाचा

परिस्थिती 47 वर्षांपासून तशीच

गावातील ही समस्या आताच निर्माण झालेली नाही. गेल्या 47 वर्षांपासून ही परिस्थिती आहे. धनोरा गावाच्या तीन बाजूला पाणी आहे. शिवना नदीसुद्धा गावाला लागून आहे. या नदीवर पूल नाही. जर मुलांनी पाण्यातून प्रवास केला नाही तर त्यांना 25 किमी चिखलातून रोज प्रवास करावा लागेल. गावकऱ्यांना या ठिकाणी पूल हवा आहे. त्यासाठी ते अनेक वर्षांपासून मागणी करत आहे.

तहसीलदाराने केला अहवाल

गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. त्याचा अहवाल तयार केला आहे. त्यांनी म्हटले की, जायकवाडी प्रकल्पाच्या वेळी संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु काही परिवारांना आपल्या शेतातच राहायचे आहे. यामुळे त्यांच्या मुलांना पाण्यातून प्रवास करावा लागतो. हा प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.