पुणेकर असणारे अजय बंगा सांभाळणार जागतिक बँकेची चावी, कशी झाली निवड निश्चित

पुणे शहरात जन्म झालेले भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक, अर्थतज्ज्ञ अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवड बुधवारी जवळपास निश्चित झाली आहे. कारण त्यांच्याविरोधात या पदासाठी दुसरे कोणाचेही नाव आले नाही.

पुणेकर असणारे अजय बंगा सांभाळणार जागतिक बँकेची चावी, कशी झाली निवड निश्चित
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 11:17 AM

पुणे : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाची शिफारस केली होती. भारतीय वंशाचे व  पुणे शहरात जन्म झालेले अमेरिकन उद्योजक, अर्थतज्ज्ञ असलेले अजय बंगा आता जागतिक बँकेचे अध्यक्ष होणार आहे. त्यांची निवड बुधवारी जवळपास निश्चित झाली आहे. कारण त्यांच्याविरोधात या पदासाठी दुसरे कोणाचेही नाव आले नाही. अजय बंगा यांचे महाराष्ट्राशी आणि पुण्याशी नाते आहे. त्याबद्दल आता पुणेकरांना अभिमान वाटणार आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये अजय बंगा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.

मुदत संपण्यापूर्वी मालपास बाहेर

जागतिक बँकेचे विद्यमान प्रमुख डेव्हिड मालपास यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२४ मध्ये संपुष्टात येणार होता पण त्याआधीच त्यांनी पदमुक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या जागी अजय बंगा जागतिक बँकेचे सूत्र सांभाळणार आहे. कारण इतर कोणत्याही देशाने या पदासाठी उमेदवार जाहीर केला नाही. बुधवारी दावेदारीची मुदत संपली. यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे.

हे सुद्धा वाचा

बंगा यांचा जन्म पुण्यात

६३ वर्षीय बंगा यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला. त्यांचे वडील हभजनसिंग बंगा भारतीय लष्करात होते. ते लेफ्टनंट जनरल पदावरुन निवृत्त झाले. पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथे तैनात होते, त्यावेळी अजय यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ कुटंब पंजाबमधील जालंधरचे आहे. शालेय शिक्षणानंतर अजय बंगा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी IIM अहमदाबादमधून एमबीए केले.

३० वर्षांचा अनुभव

जागतिक बँकेनं हवामान बदलाबाबत (Climate Change) ठोस पावलं उचलावी, यासाठीचा पाठपुरावा अमेरिका सातत्यानं करत आहे. त्याचवेळी अजय बंगा यांचं नाव अमेरिकेनं सूचवले आहे. त्यांनी दशकभराहून अधिक काळ मास्टरकार्ड या क्रेडीट कार्ड कंपनीचं नेतृत्त्व केलं. ते सध्या एका खासगी इक्विटीमध्ये काम करत आहेत. यापुर्वी सिटीग्रुपच्या अशिया-पॅसिपिक रिजनचे सीईओ होते.

नेस्लेमधून केली सुरुवात

1996 मध्ये सिटीग्रुपमध्ये जाण्यापुर्वी बंगा 1981 मध्ये नेस्ले कंपनीतून आपल्या करियरची सुरुवात केली. भारतात त्यांनी 13 वर्षे काम केले. पेप्सिकोमध्ये दोन वर्ष त्यांनी काम केले. त्याचबरोबर अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स व Dow Inc.मध्येही त्यांनी काम केले. त्यांना सामाजिक विकास विषयात रुची आहे.

बाराक ओबामासोबत केले काम

2015 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर त्यांनी काम केले. व्यापार धोरणासंदर्भात ते त्यांचे सल्लागार होते. जागतिक बँक जगभरातील 189 देशांचे नेतृत्व करते. बँकेच्या उद्देश जगभरातील गरिबीचे निर्मूलन करणे हा आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.