Ratan Tata | रतन टाटा यांचा आदिती भोसले यांना फोन आला अन्…
Ratan Tata | पुणे येथील उद्योजक आदिती भोसले यांना एके दिवशी रात्री रतन टाटा यांचा फोन आला. त्या फोन कॉलनंतर त्यांचे जीवनच बदलले. रतन टाटा यांनी त्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाची माहिती घेतली आणि भेटण्याचे आमंत्रण दिले.

पुणे | 17 ऑक्टोंबर 2023 : रात्री आदिती भोसले हिचा मोबाइलची रिंग वाजली. आदितीने पहिले मुंबईतील लॅण्डलाईनवरुन फोन येत आहे. तिने फोन उचलताच समोरुन उत्तर मिळाले. रतन टाटा कॉलवर आहेत. त्यांना आदिती आणि चेतन यांच्याशी बोलायचे आहे. काही वेळ आदितीला खरंच वाटले नाही. परंतु त्यानंतर स्वत: रतन टाटा यांनी दोघांशी संवाद साधला. त्यानंतर पुणे येथील ३० वर्षीय आदिती भोसल हिचे जीवनच बदलले. रिपोस एनर्जीची संस्थापक असलेल्या आदिती भोसले हिच्या जीवनात हा कॉल खूप महत्वाचा ठरला.
काय आहे रिपोस एनर्जी
रतन टाटा यांनी जेव्हा रिपोस एनर्जी संदर्भात ऐकले, त्यांना कुतूहल निर्माण झाले. आदिती भोसले हिला ही कल्पना कशी आली? सन 2017 मध्ये पुणे शहरात वीज कपात सुरु होती. संपूर्ण शहर अनेक तास अंधारात होते. पेट्रोल-डिझेल घेण्यासाठी उद्योगांनाही पेट्रोल पंपावर जावे लागत होते. त्याचवेळी आदिती हिला मोबाईल पेट्रोल पंपाची आयडिया आली. कारण पेट्रोल पंपासाठी मोठ्या जागेची गरज असते. त्यांनी तिने अभ्यास सुरु केला.
देशातील पेट्रोल पंपांना मागणी पूर्ण करण्यात अपयश
देशात 55000 पेट्रोल पंप आहेत. परंतु उद्योग जगताची मागणी ते पूर्ण करु शकत नव्हते. यामुळे आदिती आणि चेतन या दाम्पत्यांनी मोबाइल पेट्रोल पंप बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी रिपोस एनर्जी ही कंपनी बनवली. आदिती भोसले आणि चेतन भोसले यांच्या रिपोस एनर्जीचे आज देशभरातील 300 शहरांमध्ये 2000 पेक्षा जास्त पेट्रोल पंप आहेत. वार्षिक 65 कोटी रुपयांची उलाढाल आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. या कंपनीसाठी रतन टाटा यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे.




आदिती भोसले उद्योजक कुटुंबातून
आदिती भोसले उद्योजक कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अनेक पेट्रोल पंप, कंन्स्ट्रक्सन आणि हॉस्पिटेलिटी व्यवसाय आहेत. परंतु आदितीला काही वेगळे करायचे होते. समाजात बदल होईल, असे तिला काही सुरु करायचे होते. त्यामुळे चेतन याच्याशी लग्न झाले तेव्हा तिने हा विषय सांगितला. त्यानंतर दोघांनी मिळून रिपोस एनर्जीची स्थापना केली. आज हा प्रकल्प चांगलाच यशस्वी झाला आहे.