महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान, हे गावोगावी सांगा, नड्डा यांनी दिला कार्यकर्त्यांना संदेश

JP Nadda speech : भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पुण्यात सुरु आहे. या बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला. गावागावी जाऊन सरकारची कामगिरी सांगण्याचे आवाहन केले.

महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान, हे गावोगावी सांगा, नड्डा यांनी दिला कार्यकर्त्यांना संदेश
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 5:21 PM

प्रदीप कापसे, पुणे : राज्यात अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारच्या काळात विकासाची कामे थांबवलीत. यामुळे महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान, हे गावोगावी जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे. कोरोनाच्या काळात सर्व पक्ष आयसीयूत होते, मात्र भाजप सामाजिक कार्यात पुढे होता, त्याची आठवण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली. पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यानी राज्य सरकार आणि मोदी सरकारची कामगिरी जनतेपुढे नेण्याचे सांगितले.

जगात मंदी पण भारत सुरक्षित

आपल्या भाषणात नड्डा म्हणाले की, महाराष्ट्रात आल्यावर मला ऊर्जा मिळत असते. मोदी सरकारच्या काळात मोठा विकास झाला आहे. देशात गेल्या 70 वर्षात 74 विमानतळे झाली. मोदी सरकारच्या 9 वर्षांत 74 विमानतळ झाली आहेत, हा बदल आहे. भाजप आणि एनडीए म्हणजेच विकास आहे. जगात मंदी आली आहे, भारत आपल्या नितीमुळे पुढे गेला आहे. भारताला मंदीच्या झळा बसल्या नाहीत. आपल्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. आज सरकारचा जो अभिनंदनाचा ठराव केला त्याला महाराष्ट्र सरकार पात्र आहे.

निकालाची चिंता नाही, विजय आपलाच

आम्हाला निकालाची चिंता नाहीय, आम्हीच येणार हे माहितीय, आम्हीच पुढे जाणार आहोत. मात्र तेही मेहनीतीने होणार आहे. याठिकाणी आलेल्या प्रत्येकाने 10 लोकं जोडायची आहेत. मग आपले जाळे किती मोठे होईल, ते तुम्हाला दिसेल. राज्यात असो की देशात आता येणारी कुठलीही निवडणूक भाजप जिंकणार आहे. सर्वत्र एनडीएचा विजय होणार आहे. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामगिरी जनतेत न्यावी, असे आवाहन जे.पी.नड्डा यांनी केले.

आमदारांसोबत बैठक

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांची आमदार, खासदारांसोबत बैठक होणार आहे. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात ही बैठक होणार आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिल्यानंतर आता जे पी नड्डा आमदारांना काय कानमंत्र देणार? याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे.

बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मार्गदर्शन केले.

हे ही वाचा

पुण्यात बावनकुळे यांनी मांडले भाजपचे आगामी व्हिजन, रणनीती सांगत केली पुणे भाजपात बदलाची घोषणा

सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या आठ मागण्यांपैकी कोणती मागणी मान्य केली? फडणवीस यांनी विचारला सवाल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.