AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरात बॅनर वार, आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा, आम्ही दाबणार NOTA

कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजपच्या या बालेकिल्ल्यात आता पुन्हा पोस्टर झळकला आहे. कसबा पेठेत बॅनर लागण्याची ही दुसरी वेळ आहे.

पुणे शहरात बॅनर वार, आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा, आम्ही दाबणार NOTA
पुण्यात पुन्हा भाजपविरोधात बॅनरImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Feb 11, 2023 | 3:45 PM
Share

पुणे   : माघारीची मुदत संपल्यानंतर पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र (Pimpri Chinchwad byelection)स्पष्ट झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप (pimpri chinchwad bjp candidate) आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आता होणार आहे. त्यानंतर राहुल कलाटे यांच्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले होते. आता कसबा पेठेत टिळक परिवाराला उमेदवारी दिली नाही, यावरुन बॅनर लागले आहे. कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजपच्या या बालेकिल्ल्यात आता पुन्हा पोस्टर झळकला आहे.

कसबा पेठ येथे भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पुणे कसबा पेठ मतदार संघातून टिळक परिवाराला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही. यामुळे पुण्यातील मोदी गणपतीजवळ अज्ञातांकडून बॅनर लावण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की,

आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा

कसबा हा गाडगीळांचा

कसबा हा बापटांचा

कसबा टिळकांचा

का काढला आमच्याकडून कसबा

आम्ही दाबणार NOTA

यापुर्वी लावले होते बॅनर

कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे ब्राम्हण समाज संतप्त झाला आहे. यापुर्वी कसबा पेठेत बॅनर लावले होते. कुलकर्णीचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?

सकाळी पिंपरी चिंचवडमध्ये बॅनर

पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्सच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यांवर निशाणा साधण्यात आलाय. ही बंडखोरी खोके घेऊन झाल्याचं त्यात म्हटलंय आहे. यातून त्यांची गुलामी अन गद्दारी समोर आल्याचं म्हटले आहे.

एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून…

नागपूरची गुलामी,

ठाण्याची गद्दारी,

एकदेव ओके डोक्यातून…

खरा शिवसैनिक असे या बॅनरमध्ये म्हटले आहे.

कोणी लावले बॅनर

पिंपरी-चिंचवडमध्ये आणि आता पुणे शहरात लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे राजकारण तापले आहे. परंतु हे बॅनर कोणी लावले? हे स्पष्ट झाले नाही. यामुळे या बॅनरमागे आहेत तरी कोण? याचा शोध घ्यावा लागणार आहे. एकंदरीत पुण्यातील ब्राम्हण समाज भाजपवर नाराज असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. त्यात सत्यता किती हे मतमोजणीला स्पष्ट होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.