पुणे शहरात हॉकीचा वाद पेटला, अल्पवयीन मुलींसह चौघांना जबर मारहाण

पुणे शहरात हॉकी खेळावरून काही वाद झाले होते. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी मित्राच्या तीन बहिणींना आणि आईला मारहाण केली. या घटनेत चौघे जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

पुणे शहरात हॉकीचा वाद पेटला, अल्पवयीन मुलींसह चौघांना जबर मारहाण
दुकानाचे शटर तोडून मोबाईलची चोरी
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 3:53 PM

अभिजित पोटे, पुणे : पुण्यात हॉकी खेळण्याचा वादातून चार जणांनी मित्राच्या तीन अल्पवयीन बहिणींवर व आईवर प्राणघातक हल्ला केला. ११, १५ आणि १६ वर्षीय मुलींवर हल्ला करण्यात आला. चार जणांनी या तीन मुलींना व तिच्या आईला लोखंडी रॉड, पाईपने मारहाण केली. चौघांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तीन अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील वारजे भागातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा सहानी यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर या प्रकरणी रामनाथ सहानी,राम सहानी आणि दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही संपूर्ण घटना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमाराची आहे. वारजेतील दांगट वस्ती जवळ हा प्रकार घडला होता. कृष्णा सहानी आणि आरोपी हे दोघेही एकमेकांना ओळखतात.

हे सुद्धा वाचा

दोघांमध्ये झाला होता वाद

कृष्णा आणि आरोपींमध्ये हॉकी खेळावरून काही वाद झाला होता. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी कृष्णा याला मारण्यासाठी थेट घरात प्रवेश केला. यावेळी आरोपींना कृष्णा घरात मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी घरातील उपस्थित असलेल्या महिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

त्यात कृष्णा याच्या तीन बहिणी आणि आई होत्या. या हल्ल्यात कृष्णा यांची आई तसेच तीन लहान बहिणी यांच्यावर रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन साथीदारांनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या लहान मुलींना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून यातील दोन जणींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वारजे पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.