IMD चा नवा प्रकल्प, पुणे शहरातील तापमान अन् पाऊस तुम्हाला रस्त्यात समजणार
पुणे शहरात नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्प आणि पुणे हवामान विभागाने आणखी एक सुविधा निर्माण करुन दिली आहे. शहरातील रस्त्यांवर डिजिटल डिस्प्ले बसवले गेले आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर बसवण्यात आलेेल्या डिस्पेमधून अपडेट माहिती मिळणार आहे.
पुणे : देशातील पुणे, ठाणे, नागपूरसह शंभर शहरे स्मार्ट सिटी केली जात आहे. या प्रकल्पातंर्गत विविध सुविधा या शहरांमधील नागरिकांना दिल्या जात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची मुदत ३१ मे रोजी पूर्ण होणार असल्याने काही कामे वेगाने पूर्ण करण्याचा हालचाली सुरु आहेत. या प्रकल्पातंर्गत पुणे शहरातील नागरिकांना आणखी एक सुविधा मिळाली आहे. या सुविधेमुळे पुणेकरांना रस्त्यातून जातांना-येतांना आज किती पाऊस झाला? आज किती तापमान आहे? यासंदर्भातील अपडेट माहिती मिळणार आहे. पुणे हवामान विभागाने स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रकल्प सुरु केला आहे.
काय आहे प्रकल्प
पुणे शहरात हवामान विभागाने डिजिटल डिस्प्ले बसवले आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर हे डिस्प्ले बसवण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून शहरातील तापमान आणि पावसाची माहिती मिळणार आहे. हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसळीकर यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यामाने शहरातील मुख्य रस्त्यांवर डिजिटल डिस्प्ले बसवण्यात आले आहे. यानंतर सर्व नागरिकांना तापमान आणि पाऊस याबाबतची अपडेट माहिती मिळणार आहे.
सध्या पुणे शहरातील तापमान, पाऊस याची माहिती वेबसाईट व सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले जाते. परंतु आता ही माहिती सहज मिळणार आहे. यामुळे अनेकांना त्याचा फायदा होणार आहे.
To improve IMD's outreach & a step towards Urban Met;IMD Pune with Pune Smart City Development Corp Ltd & PMC initiated sharing Weather Info on Digital Display Boards at various places within Pune City.Location wise weather inf;Tmax, Tmin, 24hr rainfall is availableMore to come pic.twitter.com/IX2oX8ENZ1
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 13, 2023
काय आहे स्मार्ट सिटी प्रकल्प
केंद्र सरकारने २५ जून २०१५ रोजी स्मार्ट सिटी मिशनची सुरुवात केली होती. यासाठी देशभरातील शंभर शहरांची स्मार्ट सिटी मिशनमध्ये निवड केली होती. त्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कल्याण-डोंबिवली, सोलापूर या महाराष्ट्रातील शहरांचा समावेश आहे. या माध्यमांतून या शहरात अद्यावत पायाभूत सुविधा करण्यावर भर देण्यात येणार आहे.
हे ही वाचा
पुण्याची महिला मोटारसायकलवर साडी परिधान करुन निघाली वर्ल्ड टूरला, एक लाख किमी प्रवास करणार