डमी अधिकारी तयार केले अन् नोकरीसाठी 100 पेक्षा जास्त तरुणांची केली फसवणूक

Pune Crime News : नोकरीसाठी फसवणूक करणारा एका भामट्याला पकडण्यात आले आहे. त्याने १०० पेक्षा जास्त तरुणांची फसवणूक केली आहे. उमेदवारांचा विश्वास बसावा, यासाठी तो बनावट अधिकारी उभे करत होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

डमी अधिकारी तयार केले अन् नोकरीसाठी 100 पेक्षा जास्त तरुणांची केली फसवणूक
पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला गंडा
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 1:33 PM

अभिजित पोते, पुणे : देशातील अनेक तरुण, तरुणी शासकीय नोकरीची वाट पाहत असतात. त्यासाठी जोरदार मेहनत करतात. काही जणांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश येते. परंतु काही युवक नोकरीसाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवतात. मग या युवकांना हेरुन त्यांच्यांकडून माया जमा करणारे एजंट अधूनमधून उजडेत असतात. आता १०० पेक्षा जास्त तरुणांची फसवणूक करणारा भामटा सापडला आहे. या व्यक्तीला मिलिटरी इंटेलिजन्स युनिट अन् पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फसवणूक करणार आहे कोण?

भारतीय लष्करात नोकरी लावून देतो, असे सांगत तरुणाची २८ लाख रुपयांमध्ये फसवणूक करणारा व्यक्तीला मिलिटरी इंटेलिजन्स युनिटने ताब्यात घेतले आहे. पैसे देणाऱ्या व्यक्तीची खात्री बसावी, त्यांना विश्वास निर्माण व्हावा, म्हणून आरोपीने डमी अधिकारी उभे केले होते. प्रमोद यादव असे आरोपीचे नाव आहे. प्रमोद यादव हा मूळचा नाशिक येथील आहे. आत्तापर्यंत १०० हून अधिक तरुणांची त्याने फसवणूक केली आहे. राहुल बच्छाव यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

बनावट अधिकारी उभे करत होता

नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्यांचा विश्वास निर्माण करण्यासाठी प्रमोद यादव चक्क डमी अधिकारी तयार करत होता. भारतीय लष्कराचा युनिफॉर्म परिधान करुन तो बनावट अधिकारी उभे करत होता. हा संपूर्ण प्रकार सप्टेंबर २०२२ पासून आज पर्यंत सुरू होता. ही कारवाई स्पेशल इनपुट मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण विभाग पुणे आणि पुणे पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे तक्रार

राहुल बच्छाव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तो भारतीय लष्करात भरतीसाठी प्रयत्न करत होते. यावेळी त्याची ओळख प्रमोद यादव याच्याशी झाली. मग प्रमोदने आपण लष्करात नोकरी लावून देऊ परंतु त्यासाठी पैसे लागतील तसेच परीक्षा देण्यासाठी तुम्हाला यायला लागेल, असे सांगितले. परीक्षेची तयारी करावी लागेल, असे खोटे मार्गदर्शन केले.

पुढे जाऊन प्रमोद यादव याने राहुल याचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय लष्कराचा युनिफॉर्म परिधान केलेले ७ ते ८ डमी अधिकारी उभे केले. प्रमोद याला वारंवार पैसे देऊन सुद्धा पुढे काही होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुल बच्छव याने पोलिसात तक्रार दिली. भारतीय लष्करात नोकरी लावून देतो या प्रकरणात १०० हून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर झाले आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....