Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांना महानगरपालिकेकडून मिळणार २५० कोटी रुपये, काय आहे कारण?

Pune News : पुणे शहरातील नागरिकांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. एकूण २५० कोटी रुपये पुणेकरांना देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मिळकत कराबाबत घेतलेल्या निर्णयानंतर ही रक्कम पुणेकरांना मिळणार आहे.

पुणेकरांना महानगरपालिकेकडून मिळणार २५० कोटी रुपये, काय आहे कारण?
पुणे महानगरपालिकाImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 11:28 AM

पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. पुणे शहरातील नागरिकांना धनलाभ होणार आहे. पुणे महानगरपालिका पुणेकरांना २५० कोटी रुपये देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर ही भेट पुणेकरांना मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांचा फायदा होणार आहे. एकूण चार टप्प्यात पुणे शहरातील नागरिकांना पैसे मिळणार आहे. यासंदर्भातील प्रक्रिया पुणे महानगरपालिकेने सुरु केली आहे. यामुळे पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

का मिळणार पैसे

पुणे महापालिकेने स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास नागरिकांना घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून आता 15% सवलत मिळणार आहे. यापूर्वी ही सवलत 10% होती. ही सवलत २०१९ पासून मिळणार आहे. यामुळे मिळकत कराची २०१९ पासून शंभर टक्के रक्कम भरणाऱ्या पुणेकरांना ४० टक्के रक्कम परत मिळणार आहे. ही रक्कम एकूण २५० कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

ही होती मागणी

पुणे महानगरपालिकेने 28 ऑगस्ट, 2019 रोजी पुन्हा एक मुख्य सभा ठराव पारित करुन या सवलतीमुळे वसुली करावयाची थकबाकीची रक्कम पुर्वलक्षी प्रभावाने करु नये व 2019 पर्यंत ज्या पध्दतीने सवलत देण्यात येत होती ती तशीच यापुढेही सुरू राहावी अशी मागणी शासनाकडे केली होती.

त्याअनुषंगाने 01 एप्रिल, 2023 पासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून 10% ऐवजी 15% सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षीक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करतांना 40% सवलत लागू होणार आहे. तसेच 31 मार्च, 2023 पर्यंतच्या फरकाच्या रकमेची वसुली माफ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

कशी मिळणार रक्कम

पुणेकरांना चार टप्प्यात मिळकत कराची रक्कम मिळणार आहे. २०१९ नंतर शंभर टक्के रक्कम भरणाऱ्या सर्वांना ही रक्कम मिळणार आहे. जवळपास 250 कोटी रुपये महापालिका परत करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठक १९ एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. पुण्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

हे ही वाचा

खारघर घटनेनंतर तापमान देण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल, आता हवामान विभाग नवीन प्रणाली अवलंबणार

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.