IT सिटी असलेल्या पुण्यात उद्योजकांची मोठी गुंतवणूक, आकडेवारी वाचून तुम्हाला बसले सुखद धक्का

पुणे शहर आता आणखी एक विक्रम करणार आहे. पुण्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. संरक्षण उत्पादनाची नगरी म्हणून पुणे शहराची ओळख लवकरच होणार आहे. पुणे शहरात देशातील अव्वल संरक्षण कंपन्या गुंतवणूक करणार आहे.

IT सिटी असलेल्या पुण्यात उद्योजकांची मोठी गुंतवणूक, आकडेवारी वाचून तुम्हाला बसले सुखद धक्का
पुणे उद्योग
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 8:13 AM

पुणे : पुणे शहर शिक्षणाची पंढरी आहे. उच्च शिक्षणाच्या नामांकीत संस्था पुण्यात आहेत. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. उद्योग नगरी म्हणून पुणे राज्यात अव्वल स्थानी आहे. त्यानंतर काळाप्रमाणे बदल करत आयटी हब पुणे झाले. आता पुणे शहर अजून एक मोठा पल्ला गाठणार आहे. संरक्षण उत्पादनाची नगरी म्हणून पुणे शहराची ओळख होणार आहे. पुणे शहरात देशातील अव्वल संरक्षण कंपन्या गुंतवणूक करणार आहे. शेकडो कंपन्या कोट्यवधींची गुंतवणूक करणार आहे.

किती कंपन्या येणार

देशात संरक्षण उत्पादनात पुणे अव्वल स्थानी येणार आहेत. कारण आता संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या २५० कंपन्या पुण्यात येणार आहेत. देशभरातून अन् विदेशातून नव्या २५० कंपन्या पुण्यात गुंतवणूक करणार आहेत. जवळपास सर्व कंपन्यांची पुण्यातील सदन कमांडला पसंती दिली आहे. लष्कराचे सर्व महत्त्वाचे साहित्य पुणे शहरात तयार होणार आहे.

हे सुद्धा वाचा

किती होणार उलाढाल

पुणे शहरात २५० कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. यामुळे ३ हजार ५०० कोटींची उलाढाल पुणे शहरात होणार आहे. देशाच्या संरक्षण दलाला लागणारी लष्करी सामग्री पुण्यात तयार होणार आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे 250 एकरावर स्वतंत्र, आदर्शवत असे इलेक्ट्रॉनिक पार्क उभारण्याची घोषणा ही करण्यात आली आहे. याद्वारे देश-विदेशातील गुंतवणूक राज्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणामुळे देशात स्वदेशी कंपन्यांना प्रोत्सहन दिले जात आहे. या कंपन्यांची गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विरोधकांकडून झाली होती टीका

वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल विरोधकांनी केला होता.

हे वाचा

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....