पुणे शहरात अतिक्रमणाचा वाद पेटला, कुठे अधिकाऱ्याची दबंगगिरी, कुठे पोलिसांना मारहाण
Pune News : पुणे शहरात अतिक्रमणाचा विषय चांगलाच पेटला आहे. अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना अधिकाऱ्यांनी दंबगगिरी केल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यामुळे महानगरपालिकेत आंदोलन करण्यात आले.
पुणे : पुणे शहरात अतिक्रमणविरोधात कारवाईवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी गुंडागर्दी आणि मारहाणीच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची दबंगगिरी दिसत आहे. तर एका ठिकाणी पोलिसांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. या घटनेत युवक काँग्रेसने पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
युवक काँग्रेस आक्रमक
अतिक्रमण कारवाई करताना लाथा मारून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसने केली. त्यांनी डेक्कन पोलिसांत तक्रार दिली. अतिक्रमण कारवाई करताना दमदाटी केल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. पुण्यातील डेक्कन पोलिसांत माधव जगतापांविरोधात तक्रार देण्यात आली.
पहिली घटना
पुणे मनपा अधिकारी माधव जगताप यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात फर्गुसन कॉलेज परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई सुरु असताना एका रेस्टॉरेंटमध्ये ते गेले. त्याठिकणी असलेल्या सामानावर लाथ मारली. ही घटना काही जणांनी सीसीटीव्हीमध्ये कैद केली. तसेच व्हिडिओसुद्धा काढला गेला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पुणे शहरात मनपा अधिकाऱ्याची दबंगगिरी#Pune #pmc pic.twitter.com/7jNKqvwp6y
— jitendra (@jitendrazavar) May 17, 2023
दुसरी घटना
पुण्यात अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची दुसरी घटना घडली आहे. पुण्यातील ढोले पाटील रोडवर अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण निरीक्षक, पोलिसांना नागरिकांनी केली बेदम मारहाण करण्यात आली. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना हा प्रकार घडला आहे. मारहाणीत अतिक्रमण निरीक्षक आणि सुरक्षारक्षक जखमी झाले आहे. हा व्हायरल व्हिडिओ कधीचा आहे, हे स्पष्ट झाले नाही.
What Happen In Pune pic.twitter.com/E9Z06RY7pa
— jitendra (@jitendrazavar) May 17, 2023
काय म्हणतात जगताप
या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप म्हणाले की, अतिक्रमण काढताना मला आणि माझ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली गेली. आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली गेली. त्यावर कोणी बोलत नाही. व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात असल्याचं स्पष्टीकरण माधव जगताप यांनी दिल आहे.
कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच आंदोलन केले. अतिक्रमण विभागाचा कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात पुणे महापालिकेच्या समोर अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.