Pune Crime News | डॉक्टर तुम्ही हे काय केले? शेवटी खावी लागली जेलची हवा
Pune Crime News | सोशल मीडियाचा वापर आता सर्वच तरुण, तरुणी करु लागल्या आहेत. सोशल मीडियामार्फत झालेल्या ओळखीमधून फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे.
पुणे | 26 सप्टेंबर 2023 : सोशल मीडिया तरुणाईचा आवडता प्लॅटफॉर्म बनला आहे. अनेक तरुण, तरुणी सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असतात. परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. आता पुणे शहरात एका डॉक्टराने सोशल मीडियातून झालेल्या ओळखीनंतर जे काम केले त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकारामुळे डॉक्टराला आता जेलची हवा खावी लागली आहे. डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
काय घडला प्रकार
पुणे शहरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका २० वर्षीय तरुणीची ओळख डॉ. शुभंकर महापुरे (वय २६) याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. डॉक्टर महापूरे याने त्या तरुणीला भेटण्यासाठी त्याच्या नारायण पेठेतील क्लिनिकमध्ये बोलवले. त्यावेळी दोघांनी जेवण केले. डॉक्टर शुभंकर महापुरे याने त्या तरुणीला बकार्डी नावाची रम डॉक्टर पाजली.
डॉक्टराने मद्य पाजल्यावर…
डॉक्टर शुभंकर महापुरे याने तरुणीला मद्य पाजले होते. त्यानंतर तिला गुंगी आली. त्याचा गैरफायदा घेत शुभंकर महापुरेने तिच्यावर अत्याचार केला. तरुणीची नशा उतरल्यावर तिला हा प्रकार समजला. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी डॉक्टर शुभंकर महापुरे विरुद्ध लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. २४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
सोशल मीडियाचा वापर करताना सावध व्हा
तरुणी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे. त्यामाध्यमातून झालेल्या ओळखीतून फसवणुकीचे अनेक प्रकार उघड होत आहे. आता तर चक्क एका डॉक्टरने अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे. सोशल मीडियातील व्यक्तीवर विश्वास लगेच ठेऊ नये. अन्यथा मोठा धोका निर्माण होतो.