Pune IT City : भारताची आयटी निर्यात वाढली, पुणे शहरातील या कंपनीचा महत्वाचा वाटा

Pune IT City : पुणे शहर औद्योगिक विकास जोरात झाला. उद्योगाची नगरी म्हणून पुणे शहराची ओळख झाली. त्यानंतर आता पुणे शहराची नवीन ओळख निर्माण झाली आहे. पुणे शहराला माहिती आणि तंत्रज्ञानाची नगरी म्हटली जात आहे.

Pune IT City : भारताची आयटी निर्यात वाढली, पुणे शहरातील या कंपनीचा महत्वाचा वाटा
pune it companiesImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 3:16 PM

पुणे | 13 ऑगस्ट 2023 : पुणे शहर शिक्षणाची आणि संस्कृतीची राजधानी. पुण्यात अनेक मोठे उद्योग उभे राहिले. त्यानंतर पुणे शहरातील रोजगार वाढला. पुणे शहरातील वातावरण, मुंबईचा असणार निकटचा संबंध, देशपातळीवर जाण्यासाठी असलेल्या वाहतुकीच्या सेवा यामुळे उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी या शहराला प्राधान्य दिला. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर माहिती आणि तंत्रज्ञानाची नगर म्हणजे आयटी हब म्हणून उद्यास आले आहे. या आयटी हबमुळे देशाने सॉफ्टवेअर निर्यातीतून परकीय चलन मिळवले आहे. देशाची सॉफ्टवेअर निर्यात 2023 मध्ये 8.3% ने वाढली.

कोणत्या कंपन्या आहेत पुणे शहरात

पुणे शहरात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या आहेत. परंतु यामध्ये इन्फोसिस (Infosys Ltd) या कंपनीचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. सात अभियंत्यांनी मिळून 2 जुलै 1981 रोजी पुणे शहरात या कंपन्याची स्थापना केली. ऑगस्ट 2021 मध्ये इन्फोसिस 100 बिलियन डॉलरची कंपनी झाली. सध्या कंपनीचे मुख्यालय बंगळुरमध्ये आहे. सर्वाधिक मूल्यांकन असलेली हे देशातील चौथी कंपनी आहे.

टेक महिंद्राचे मुख्यालय पुणे

1986 मध्ये स्थापन झालेल्या टेक महिंद्रा कंपनी देशातील मोठी कंपनी आहे. या आयटी कंपनीचे मुख्यालय पुणे आहे. या कंपनीची शाखा भारतासह, अमेरिका, इंग्लडमध्ये शाखा आहेत. कंपनी सॉफ्टवेअरसह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे.

TCS लिमिटेड

टीसीएस ही आटी क्षेत्रातील महत्वाची कंपनी आहे. या कंपनीच्या 46 देशांत शाखा आहेत. 1968 मध्ये या कंपनीची स्थापना झाली. त्यावेळी कंपनीचे नाव “टाटा कंप्यूटर सिस्टम्स” होते. 2004 मध्ये या कंपनीची नोंदणी शेअर बाजारात झाली. जागतिक पातळीवर दिग्गज कंपनी म्हणून टीसीएसची ओळख आहे. पुणे शहरात या कंपनीची शाखा आहे.

L&T Technology Services Ltd.

भारत इंजिनिअरमधील अग्रण्य असलेली एल अँड टी कंपनी सॉफ्टवेअर क्षेत्रात आहे. एल अँड टी टेक्नोलॉजी सर्व्हिस लिमिटेड नावाने असलेली ही कंपनीसुद्धा पुण्यात आहे. सॉफ्टवेअर निर्मितीबरोबर, इंजीनियरिंग एनालिटिक्स, मॅकेनिकल आणि विनिर्माण इंजीनियरिंगमध्ये ही कंपनी कार्यरत आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.