चार कोटींचे घेतले हिरे मात्र शोरुमच्या दुसऱ्या शाखेत विकायला गेल्यावर निघाले ६५ लाखांचे, पुणे शहरातील प्रकार

Pune Crime News : पुणे शहरातील एका ज्वेलर्सच्या शोरुमध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ग्राहकाला चार कोटी रुपये किंमतीचे दगिने दिले गेले. परंतु त्यांची किंमत फक्त ६५ लाख रुपये निघाली.

चार कोटींचे घेतले हिरे मात्र शोरुमच्या दुसऱ्या शाखेत विकायला गेल्यावर निघाले ६५ लाखांचे, पुणे शहरातील प्रकार
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 1:31 PM

पुणे : पुणे शहरातील नामांकीत कंपनीच्या शोरुममधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक कोट्यवधी रुपयांची आहे. ग्राहकाला 4.14 कोटी रुपयांचे हिऱ्याचे दागिने विकले गेले आहे. परंतु या दागिन्यांची किंमत फक्त 65.76 लाख रुपये निघाली. त्याच शोरुमच्या दुसऱ्या शाखेतून दागिन्यांची खरी किंमत उघड झाली. या प्रकरणी ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकार

पुणे शहरातील लोणी काळभोर येथील स्वाती हेमंत हडके यांनी लक्ष्मी रोडवर असलेल्या तनिष्काच्या शोरुममधून हिऱ्यांचे दागिने खरेदी केले. या दागिन्यांची किंमत 4.14 रुपये होती. त्यासंदर्भातील बिलसुद्धा त्यांना देण्यात आले. डिसेंबर 2018 ते जानेवारी 2022 या कालावधीत एका योजनेचे सदस्यत्व त्यांनी घेतले होते. त्यामाध्यमातून हे हिऱ्यांचे दागिने घेण्यात आले.

मग जानेवारी 2023 मध्ये हे दागिने देऊन दुसरे नवीन दागिने घेण्याचा त्यांनी विचार केला. त्यासाठी ते परत शोरुममध्ये गेले. परंतु त्यांना टाळाटाळ करण्यात आली. वारंवार आग्रह करुनही त्यांचे ते दागिने घेतले जात नव्हते. यामुळे हडके यांनी तनिष्काच्या दुसऱ्या शाखेत ते दागिने दाखवले. त्यावेळी त्या दागिन्यांची किंमत फक्त 65.76 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दागिने विक्रीतून त्यांची 3 कोटी ४८ लाखांत फसवणूक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

कंपनीने केली करवाई

तनिष्का शोरुममध्ये या प्रकाराची तक्रार गेली. त्यानंतर कंपनीने चौकशी केली. पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला. तनिष्का शोरुमकडून या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सहा जणांची भूमिका तपासली जात असल्याचे तनिष्का शोरुमच्या प्रवक्त्याने सांगितले.

मुलीच्या लग्नासाठी केली होती गुंतवणूक

तक्रारदार हेमंत हडके यांनी सांगितले की, मुलीच्या लग्नासाठी आम्ही गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीची किंमत चार वर्षात 28 कोटी रुपये होईल, असे आम्हाला सांगितले होते. परंतु दागिने घेण्यास लक्ष्मी रोड शाखेकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे आम्ही हडपसर येथील तनिष्क ज्वेलरी स्टोअरमध्ये तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.