पुणे शहरातील व्यक्तीला कोर्टाने दिली सर्वात मोठी शिक्षा, १००, २०० वर्षेही नाही तर त्यापेक्षाही जास्त

जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात आरोपीला मोठी शिक्षा दिलाय. आरोपीला दहा, वीस वर्ष नाही तर त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी शिक्षा सुनावली आहे. अगदी शंभर, दोनशे वर्षांपेक्षाही कितीतरी जास्त शिक्षा देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.

पुणे शहरातील व्यक्तीला कोर्टाने दिली सर्वात मोठी शिक्षा, १००, २०० वर्षेही नाही तर त्यापेक्षाही जास्त
इकबाल मिर्चीचा कथित साथीदार हारुन युसुफला जामीनImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 11:59 AM

पुणे, सिहोर : गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेचे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील अन् वाचले असतील. परंतु नुकताच मध्य प्रदेशातील न्यायालयाने दिलेला निकाल ऐकून आश्चर्य वाटेल. मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपींना जबर बसणारी शिक्षा दिली आहे. शिक्षा झालेल्या व्यक्तींमध्ये पुणे शहरातील व्यक्तीचाही समावेश आहे. एका आरोपीला दहा, वीस वर्ष नाही तर त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी शिक्षा झाली आहे. अगदी शंभर, दोनशे वर्षांपेक्षाही जास्त शिक्षा झालीय.

काय आहे प्रकरण

न्यायालयाने शिक्षा दिलेले प्रकरण फसवणुकीचे आहे. साईप्रसाद कंपनीच्या संचालकानी चिंटफंड कंपनी सुरु केली. त्यामाध्यमातून कोट्यवधी रुपयांमध्ये लोकांची फसवणूक केली. न्यायालयाने त्यांना 250 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कंपनीच्या सिहोर शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

कोणाला झाली शिक्षा

चिटफंड प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव बाळासाहेब भापकर आहे. त्याला 250 वर्षांची शिक्षा झाली आहे. भापकर याच्यासह कंपनीचे सीहोर शाखेचे कर्मचारी दीपसिंग वर्मा, लखनलाल वर्मा, जितेंद्र कुमार आणि राजेश परमार यांनाही प्रत्येकी पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. सिहोर जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजयकुमार शाही यांनी ही शिक्षा दिली.

काय केले आरोपीने

आरोपी बाळासाहेब भापकर याने साई प्रसाद नावाने चिटफंड कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना पाच वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. यामुळे चांगल्या नफ्याच्या आमिषाने अनेकांनी चिटफंड कंपनीत पैसे गुंतवले. मात्र पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीला कुलूप लावून पळ काढला. या प्रकरणी 2016 मध्ये सीहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आता न्यायालयाने या कंपनीच्या संचालकाला 250 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बाळासाहेब पुण्यातील रहिवाशी

चिटफंड कंपनीचे संचालक बाळासाहेब भापकर हे पुणे शहरातील रहिवासी आहेत. दीप सिंग वर्मा, राजेश उर्फ ​​चेतनारायण परमार, लखन लाल वर्मा आणि जितेंद्र कुमार वर्मा यांच्यासोबत तो ही कंपनी चालवत होता. या प्रकरणी बाळासाहेब भापकर यांना 250 वर्षांची शिक्षा झाली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.