pune pollution | पुणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार पुण्यासाठी करणार असा बदल

pune pollution | पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरु झाल्या आहेत. पुणे शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. देशात प्रथमच असा निर्णय होणार आहे.

pune pollution | पुणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार पुण्यासाठी करणार असा बदल
Pune PolluationImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 11:42 AM

पुणे | 26 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात हे सर्वाधिक वाहन असलेले शहर आहे. यामुळे चांगले वातावरण लाभलेल्या पुणे शहरातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे. पुणे शहरातील प्रदूषणावर तज्ज्ञांकडून नेहमी चिंता व्यक्त केली जात असताना केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहे. पुणे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. देशात सर्वात पहिले पुणे शहरात हा निर्णय लागू होणार आहे.

हायड्रोजन निर्मिती प्रकल्पानंतर…

पुणे शहर वाहन उद्योग क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील ५० टक्के वाहने पुणे शहरात निर्माण होतात. तसेच पुणे शहराचा विस्तार वाढल्यामुळे वाहनांची संख्या वाढली आहे. पुणे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प केंद्र सरकारने सुरु केला. पुणे शहरातील हडपसर परिसरात हा प्रकल्प उभारला जात आहे. त्या इंधनाचा वापर पुणे शहरासाठी करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक

पुण्यात हायड्रोजन निर्मिती प्रकल्प होत आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या इंधनातून आणि विजेच्या माध्यमातून गाड्या चालवल्या जाणार आहे. हायड्रोजन इंधन आणि इलेक्ट्रीसिटी अशी दुहेरी पद्धत पुण्यासाठी करण्यात येणार आहे. यानंतर पुण्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा हायड्रोजन इंधन आणि विजेवर चालवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने तयारी चालवली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक सेवेवरील पहिला प्रकल्प पुणे शहरात उभा राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

नितीन गडकरी यांचा पुढाकर

पुणे शहरातील वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढत्या प्रदूषणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक वेळा चिंता व्यक्त केली होती. ‘प्रदूषणमुक्त पुणे’ करण्यासाठी काय करता येईल, त्यावर अभ्यास सुरू करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. कचर्‍यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प पुणे शहरात सुरु झाल्यानंतर आता सार्वजिनक वाहतुकीवर लक्ष केंद्रीत केले गेले आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली  होणार आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.