AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे सॉफ्टवेअर इंजिनिअर पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात, NIA टीम करणार अभियंत्याची चौकशी

Pune Crime News : पुणे शहरातील एक अभियंत्यास अटक करण्यात आली आहे. तो पाकिस्तानमधील एजंटच्या संपर्कात होता. ओडिशा पोलिसांनी त्याला पुणे येथून अटक केली होती. त्याची आता एनआयए चौकशी करणार आहे.

पुणे सॉफ्टवेअर इंजिनिअर पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात, NIA टीम करणार अभियंत्याची चौकशी
| Updated on: Jul 10, 2023 | 5:18 PM
Share

भुवनेश्वर, पुणे : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर याचे हनी ट्रॅप प्रकरण नुकतेच उजडेत आले. त्या प्रकरणाची चर्चा अजून सुरु आहे. त्याचवेळी पुण्यातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पुणे येथील नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असलेला इंजिनिअर पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात आला होता. ओडिशा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यानंतर त्याला भुवनेश्वर येथे घेऊन गेले. आता त्याच्या चौकशीसाठी भुवनेश्वर येथे पथक गेले आहे.

काय आहे प्रकरण

मुळचा सातारा येथील असलेला अभिजित संजय जांबुरे याचा ओटीपी शेअरिंग घोटाळ्यात सहभाग होता. त्याने 2018 मध्ये फेसबुक मेसेंजरद्वारे पाकिस्तानातील सय्यद दानिश अली नक्वी यांच्याशी ओळख झाली. त्याने तो एका अमेरिकन आयटी कंपनीत कार्यरत असल्याचे सांगितले. त्या कंपनीसाठी दानिश काम करु लागला. त्यासाठी अभिजितने त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड त्याला दिला. परंतु दानिशचा पगार अभिजितच्या खात्यात जमा होत होता. त्याला तो देत नव्हता.

दानिशने केला असा उपयोग

दानिश याने अभिजीतवर केलेल्या या उपकारामुळे अभिजित त्याच्या जाळ्यात आला. दानिशने त्याची ओळख पाकिस्तान गुप्तहेर खुर्रम अब्दुल हमीद याच्याशी करून दिली. हमीद यांचे भारतात मोठे नेटवर्क आहे. मग अभिजीत खुर्रमच्या सूचनेनुसार भारतातील त्याच्या स्लीपर सेलला पैसे पाठवत होता. तसेच व्हॉट्सॲपद्वारे सात पाकिस्तानी नागरिक आणि 10 नायजेरियन नागरिकांशी संवाद केला होता. अभिजित याने गुजरात विद्यापीठातून पदवी मिळवली होती. या सर्व प्रकारामुळे अभिजितची चौकशी आता एनआयए करणार आहे. त्यासाठी एनआयएचे पथक मुंबईवरुन भुवनेश्वर येथे गेले आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.