Pune News | आयुर्वेद स्पा सेंटरच्या नावाखाली काय सुरु होता प्रकार? पोलीस पोहचले अन्…

Pune News | पुणे शहरातील एका आयुर्वेद स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये हा प्रकार सुरु होता. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी...

Pune News | आयुर्वेद स्पा सेंटरच्या नावाखाली काय सुरु होता प्रकार? पोलीस पोहचले अन्...
Spa Center file photo
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 10:20 AM

पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात अनेक ठिकाणी स्पा सेंटर सुरु झाले आहे. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेगळाच प्रकार सुरु असतो. पुणे येथील पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा प्रकार समोर आणला आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राया आयुर्वेद स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचून पोलिसांनी सचिन रतन केदारी याला अटक केली. तसेच त्या ठिकाणावरुन दोन मुलींची सुटका केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरांत आर्थिक फायद्यासाठी तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडला जात असल्याचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील इतर बातम्या

पुणे मनपा काढणार कर्ज

पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांच्या विकासासाठी महानगरपालिका कर्ज काढणार आहे. पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनच्या कामासाठी वर्ल्ड बँकेकडून कर्ज काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी यासाठी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पुढील आठवड्यात जागतिक बँकेकडून अंतिम प्रस्ताव महापालिकेला सादर केला जाणार आहे. आराखड्यानुसार या कामांसाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला

पुण्याच्या दुर्गम भागात असणाऱ्या पानशेत खोऱ्यातील शिरकोली गावात बिबटयाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात शेतकरी सुनील पांडुरंग मरगळे यांच्या तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. मरगळे यांनी जंगलात चरण्यासाठी शेळ्या सोडल्या होत्या. परंतु या शेळ्या कळपात नसल्याने मरगळे यांनी शेळ्यांचा शोध सुरु केला. त्यांना तीन शेळ्या मृत अवस्थेत आढळल्या. तसेच एका शेळीचा मृतदेह झाडावर आढळून आला. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे सुद्धा वाचा

भोर तालुक्यात धाडसी घरफोडी

पुण्याच्या भोर तालुक्यातील कासुर्डी गावात धाडसी घरफोडी झाली आहे. या घरफोडीत चार लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. कासुर्डी गावात राहणारे बाळासाहेब सोळाकुरे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरात कुणी नसताना घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. कपाट फोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा चार लाखांचा माल लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरांट्यांविरोधात राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुणे शहरात शिक्षकांचा मोर्चा

पुण्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात मोर्चा काढला. राज्य सरकारच्या शिक्षण आणि शिक्षक धोरणांच्या विरोधात शिक्षक कृती समितीकडून हा मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील शनिवार वाडा येथून मोर्चाला सुरुवात झाली. सरकारच्या आदेशाची होळी करत पुण्यातील शिक्षकांनी मोर्च्यास सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात बदल करणारे वेगवेगळे शासन आदेश काढून शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आरोप मोर्च्यात करण्यात आला.

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.