प्रशासनला जाग आली, पाच जणांच्या मृत्यूनंतर अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणार

राज्यांमधील अनेक शहरात नियम डावलून होर्डिंग लावले जात असतात. परंतु महानगरपालिकेकडून कारवाई होत नाही. आता पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. पाच जणांच्या मृत्यूनंतर हा निर्णय झालाय.

प्रशासनला जाग आली, पाच जणांच्या मृत्यूनंतर अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणार
pune hording collapsed
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 12:45 PM

प्रदीप कापसे, पुणे : अनेक शहरांचा चेहरा खराब करणारे होर्डिंग्जने पुणे शहरात पाच जणांचा जीव घेतला. सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली होती. वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुन्हा अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा चर्चेत आला आहे. शहरात अनेक ठिकाणी नियम डावलून होर्डिंग लावले जात असताना महानगरपालिकेकडून कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे. परंतु आता पाच जणांच्या मृत्यूनंतर महानगरपालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

किती आहेत अनधिकृत होर्डिंग्जवर

पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली जाणार आहे. पुणे महापालिका शहरात 1500 अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत. हे काढून टाकण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडमधील किवळेतील होर्डिंग्ज कोसळल्यानं पाच जणांचा झाला होता मृत्यू झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

स्ट्रक्चरल ऑडीट करणार

पुणे महापालिका शहरातील अधिकृत होर्डिंग्जचं करणार स्ट्रक्चरल ऑडीट करणार आहे. ऑडीटमध्ये त्रुटी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. शहरात आता महापालिका कर्मचारी करणार होर्डिंग्जची तपासणी करणार आहे.

कशी घडली होती घटना

पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारी (दि. १७) संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली आहेत. या वाऱ्यामुळे गाड्या पडल्याचं चित्र दिसत होतं.

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वारा आणि पावसापासून बचाव करण्यासाठी सात ते आठ जण होर्डिंग खाली थांबले होते. यावेळी होर्डिंग अचानक कोसळले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू तर काही जण जखमी झाले होते. पुण्यात होर्डिंग कोसळून मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही. याआधीदेखील पुण्यात रसत्यावर होर्डिंग कोसळल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुन्हा होर्डिंग कोसळले आहे. सोमवारी पडले होर्डिंग ७० बाय ४५ फुटा बेस होता. त्यावर तीस बाय चाळीसचे होर्डींग आहे. त्यासाठी जड लोखंड वापरले केला गेला होता.

हे ही वाचा

Good News : मुंबई- पुणे दरम्यान अंतर कमी करणारी बातमी, कधी सुरु होणार हा प्रकल्प

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, १६० कोटींचा कसा आहे प्रकल्प

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.