स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकास महिलेने दिले…पुण्यात उच्चभ्रू भागातील ऑफिसमध्ये बोलवून…

Pune Crime News | पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकास एका महिलेने गंडवले आहे. दीड लाखांत त्या युवकाची फसवणूक केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी महिला आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकास महिलेने दिले...पुण्यात उच्चभ्रू भागातील ऑफिसमध्ये बोलवून...
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 10:48 AM

रणजित जाधव, पुणे, 17 डिसेंबर | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षेत यश न आल्यामुळे नैराश्यात आलेल्या या युवकावर जादूटोणाचे प्रयोग करण्यात आले. त्याला गंडेदोर बांधले. पाय धुतलेले पाणी पिण्यास दिले. तुमचे वय कमी आहे. तुम्ही ३० व्या वर्षी मरणार आहे. उपचार करण्यासाठी दीड लाख रुपये द्या, असे सांगितले. सोशल मीडियावर जाहिरात करुन या पद्धतीचा व्यवसाय महिला करत होती. अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पुणे शाखेने हा प्रकार उघड केला.

सोशल मीडियावर जाहिरात करुन फसवेगिरी

पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात वृषाली संतोष ढोले शिरसाठ (वय – 39) हिने कन्सल्टन्सीचा व्यवसाय सुरु केला. त्याची जाहिरात सोशल मीडियावर केली. ती जाहिरात पाहून सप्टेंबर २०२१ मध्ये एक २३ वर्षीय युवक गेला. त्या युवकाला स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आले होते. त्यामुळे तो नैराश्येमध्ये आला होता. वृषालीने त्याला कोणतीही समस्या न विचारता अतेंद्रीय शक्तीने आपण सर्व समस्या ओळखत असल्याचे सांगितले. तिने त्या युवकास तुझा मृत्यू होणार आहे. तुझे आयुष्य केवळ ३० वर्षापर्यंत असल्याचे सांगितले. जर तुला जास्त जगायचे असेल तर काही उपचार करावे लागतील. युवकाने घाबरुन जाऊन होकार दिला.

असा सुरु केला प्रकार

वृषालीने आपल्याकडे आलौकीक शक्ती आहे, असे सांगत युवकाच्या हातात गंडा बांधला. त्याला राख खाण्यास दिली. त्यामुळे त्या युवकाच्या घशाला इजा झाली. त्याल पोटाचा विकार झाला. त्यानंतर औषध उपचार घेण्याची गरज नाही, आपली शक्ती तुला बरे करेल, असे ती सांगत होती. वेळोवेळी तिने युवकाकडून सुमारे दीड लाख रुपये अर्थिक फसवणूक केली. त्या महिलेने युवकाकडून स्वतःची पूजा करून घेऊन त्याला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आहे. तसेच वृषालीने युवकाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरीक व मानसीक आजार बरे करण्यासाठी घेऊन येण्यास सांगून त्यांचीही फसवणूक केली आहे.

हे सुद्धा वाचा

अनिसने उघड केला प्रकार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विशाल विमल यांनी हा प्रकार उघड केला. पोलिसांच्या मदतीने त्यांनी महिलेचे सर्व भांडाफोड केले. या प्रकरणी जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 420, 506(2), ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.