पुणे निवडणूक प्रचारसभेत महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस उमेदवाराने काय केले?

काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराचा धडका लावला आहे. त्यांच्या सभाही होत आहे. परंतु प्रचार सभेच्या बॅनर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो नाही. यामुळे कसब्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरु झाले आहे.

पुणे निवडणूक प्रचारसभेत महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस उमेदवाराने काय केले?
पुणे कसबा पेठेत रवींद्र धंगेकर यांची प्रचार सभा
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 10:59 AM

पुणे : पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा (Pimpri Chinchwad byelection) प्रचाराचा ज्वर आता वाढू लागला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप (pimpri chinchwad bjp candidate) आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे. तर पुणे शहरातील कसबा पेठ मतदार संघातून भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यांत लढत होत आहे. परंतु हिंदू महासंघाचे आनंद दवे या लढतीत किती मते घेतील, हे महत्वाचे आहे. दरम्यान काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. परंतु त्यांच्या प्रचार दरम्यान लावलेल्या बॅनरवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होत आहे.

नेमके काय झाले

काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराचा धडका लावला आहे. त्यांच्या मतदार संघात ठिकठिकाणी सभाही होत आहे. परंतु प्रचार सभेच्या बॅनर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो नाही. यामुळे कसब्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरु झाले आहे. त्यांनी लावलेल्या बॅनर्सवर शरद पवार, अजित पवार यांचे फोटो नाही, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

सहभाग टाळला

तसेच काँग्रेसच्या प्रचार सभेत सहभागी होणे त्यांनी टाळले आहे. या बॅनरवर अशोक चव्हाण, नीलम गोऱ्हे, विश्वजित कदम, राजेंद्र गवई यांचे फोटो आहेत. तसेच काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची नावे आहेत. परंतु कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

पुण्यात बॅनर वाद

पिंपरी-चिंचवडमध्ये आणि आता पुणे शहरात लावण्यात आलेल्या या बॅनरमुळेही राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे.

पुणे कसबा पेठ मतदार संघातून टिळक परिवाराला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही. यामुळे पुण्यातील मोदी गणपतीजवळ अज्ञातांकडून बॅनर लावण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की,

आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा

कसबा हा गाडगीळांचा

कसबा हा बापटांचा

कसबा टिळकांचा

का काढला आमच्याकडून कसबा

आम्ही दाबणार NOTA

पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्सच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यांवर निशाणा साधण्यात आलाय. ही बंडखोरी खोके घेऊन झाल्याचं त्यात म्हटलंय आहे. यातून त्यांची गुलामी अन गद्दारी समोर आल्याचं म्हटले आहे.

एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून…

नागपूरची गुलामी,

ठाण्याची गद्दारी,

एकदेव ओके डोक्यातून…

खरा शिवसैनिक असे या बॅनरमध्ये म्हटले आहे.

 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.