लग्न जमवण्यासाठी जात पंचायतीला एका लाख दिले, पण लग्न जमले नाही, मग असे काही झाले की…
Pune crime News : पुणे जिल्ह्यातील जात पंचायतीचा अजब जाच समोर आला आहे. जात पंचायतीने लग्न जमवण्यासाठी एक लाख रुपये घेतले होते. परंतु लग्न जमवले नाही. मग पैसे परत मागितल्यावर काय झाले...
अभिजित पोते, पुणे, दिनांक 13 जुलै 2023 : राज्य सरकार असो की केंद्र सरकार त्यांच्याकडून समाजातील कुप्रथाविरोधात कायदा करण्यात येतो. महाराष्ट्र सरकारने सर्व जातीतील लोकांची जात पंचायत अवैध ठरवली. त्यासाठी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर केला. सामाजिक बहिष्कार टाकण्याचे प्रकार यामुळे बंद होतील, अशी अपेक्षा होती. परंतु जात पंचायतीचा जाच काही केल्या कमी होत नाही. पुणे जिल्ह्यातून जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आणखी एक प्रकार केला आहे. लग्न जमवण्यासाठी एक लाख रुपये घेतले. मग लग्न जमले नाही, त्यामुळे पैसै परत मागितले. त्यानंतर प्रकरण पोलिसांत गेले अन् काय झाले…
काय आहे प्रकार
पुणे जिल्ह्यात जात पंचायतीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलींचे लग्न जमविण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले म्हणून कुटुंबाला वाळीत टाकले गेले. दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे फिर्याद
दौंड तालुक्यातील यवतमधील ढवरी गोसावी समाजातील व्यक्तीने फिर्यादी दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांना पाच मुली आहेत. त्यापैकी दोन मुलींचे लग्न जमवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु होता. त्यासाठी ढवरी गोसावी जातीचे काही प्रमुख पंचांना त्यांनी एक लाख रुपये दिले. परंतु जात पंचायत त्यांच्या मुलींचे लग्न जमवू शकले नाही. यामुळे त्यांनी 80 हजार परत का मागितले.
जात पंचायतीने केली कारवाई
ढवरी गोसावी समाजातील जात पंचायतीकडून पैसे परत मागितले गेली. मग जात पंचायतीचा संताप अनावर झाला. त्यांनी तातडीने जात पंचायत बसवली. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात निर्णय घेण्यात आला. ढवरी गोसावी समाजाने त्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जात पंचायतीने दिला. तसेच कुटुंबाला 435 रुपये दंड केला.
प्रकरण पोलिसांत
मुलींचे लग्न जमविण्यासाठी दिलेले 80 हजार परत मागितले या गोष्टींचा मनात राग धरून कुटुंबावर बहिष्कार टाकला. यामुळे याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली गेली. त्यानंतर त्या नऊ जणांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.