पुणे जिल्ह्यात दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या सापळ्यात, दोघांची वाहन चोरण्याची पद्धत होती निराळी
पुणे जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पिंपरी चिंचवड आणि परिसरात सातत्याने होत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांमुळे पोलीसांकडे रोज तक्रारी येत होत्या. यामुळे पोलीस आयुक्तालय चांगलेच सतर्क झाले होते. यासाठी विशेष पथकाकडे जबाबदारी देण्यात आली.
रणजित जाधव, पुणे : पुणे शहर अन् जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते.पोलिसांकडे रोज दुचाकी चोरीच्या तक्रारी येत होत्या. पोलिसांनी दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरु केली. पिंपरी चिंचवड आणि परिसरात सातत्याने होत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांमुळे सरळ पोलीस आयुक्तालय सतर्क झाले होते. त्यामुळे या चोऱ्यांचा मुसक्या आवळण्याची जबाबदारी खंडणी विरोधी पथकाकडे देण्यात आली. मग दुचाकी चोर पोलिसांच्या सापळ्यात आले. गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरांवर पोलिसांची सतत कारवाई सुरु आहे.
आले पोलिसांच्या कसे सापळ्यात
पिंपरी चिंचवड आणि परिसरात सातत्याने होत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांमुळे पोलीस आयुक्तालय चांगलेच सतर्क झाले होते. या चोरांना पकडण्याची जबाबदारी खंडणी विरोधी पथकाकडे देण्यात आली. याच कारवाई अंतर्गत खंडणी विरोधी पथकाने चाकणच्या मर्सडीज कंपनी मागे सापळा रचत दोन सराईत वाहन चोरांना अटक केली आहे. प्रतीक भालेराव आणि संदीप ढोंगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांकडून पाच लाख पाच हजार किमतीच्या 13 दुचाकी आणि दोन मोबाईल हस्तगत करण्यात आलेत
आतापर्यंत नऊ गुन्हे केले उघड
पोलिसांनी केलेल्या तपासात आत्तापर्यंत नऊ वाहन चोरीचे गुन्हे समोर आले आहेत पोलीस आणखी तपास करत आहेत. हवेली, खेड, मावळ आणि शिरूर तालुक्यातून या आरोपींनी वाहन चोरी केली. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीजवळ वाहन चोरी करणारे दोघेजण आले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.
यांनी केली कामगिरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, उपनिरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनील कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, आशिष बोटके, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.