पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तुल जप्त

सोन्याचा शर्ट परिधान करत असल्यामुळे चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या करण्यात आली होती (Gold Man Datta Fuge Murder)

पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तुल जप्त
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 9:30 AM

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील (Gold Man Datta Fuge  Murder) आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलिसांना यश आले आहे. पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे यांची जुलै 2016 मध्ये दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामुळे पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. (Pune Crime Pimpri Chinchwad Gold Man Datta Fuge Murder accuse arrested with Pistol)

तीन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त

गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणात प्रमोद उर्फ कक्काल धोलपुरिया आणि त्याचे साथीदार प्रसन्ना उर्फ सोनू ज्ञानेश्वर पवार, अंकुश डांगले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींना सापळा लावून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 93 हजार 400 रुपये किंमतीचे तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

जुलै 2016 मध्ये फुगेंची हत्या

सोन्याचा शर्ट परिधान करत असल्यामुळे चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. पुण्यात दिघी येथील भारतमाता नगर परिसरात हा प्रकार घडला होता. पद्धतशीरपणे कट रचून फुगे यांची हत्या करण्यात आल्याचे त्यांचा मुलगा शुभमने सांगितले होते. विशेष म्हणजे दत्ता फुगे यांचा मुलगा शुभमच या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदारही आहे. त्यांची पत्नी सीमा फुगे या माजी नगरसेविका आहेत.

सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे प्रसिद्ध

अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे ते पिंपरीचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जात होते. सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवून  विश्वविक्रम नोंदवल्याने ते प्रसिद्धी झोतात आले होते.

संबंधित बातम्या :

पुण्यात नवा गोल्डमॅन, सोन्याचे दागिने सोडा, चप्पल आणि बूटही सोन्याचा!

नग्न व्हिडीओ फेसबुक फ्रेण्ड्सना पाठवण्याची धमकी, पुण्यात 150 हून अधिक तरुण जाळ्यात

(Pune Crime Pimpri Chinchwad Gold Man Datta Fuge Murder accuse arrested with Pistol)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.