Cybercrime Cases : पुणे शहरात सायबर गुन्हे वाढले, आठ महिन्यांमधील गुन्ह्यांची संख्या वाचून बसेल धक्का

Pune cybercrime cases : पुणे शहरात फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. सायबर चोरट्यांकडून अनेकांची फसवणूक केली जात आहे. यासंदर्भात दाखल होणारे गुन्हे वाढत आहे. गेल्या आठ महिन्यांत लक्षणीय गुन्हे वाढले आहे.

Cybercrime Cases : पुणे शहरात सायबर गुन्हे वाढले, आठ महिन्यांमधील गुन्ह्यांची संख्या वाचून बसेल धक्का
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 11:45 AM

पुणे | 12 सप्टेंबर 2023 : सध्या सर्व काही ऑनलाइन झाले आहे. यामुळे एका मोबाईल ॲपमधून अनेक गोष्टी साध्य होतात. त्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. देशभरात सायबर फसवणूक करण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पुणे शहरात अनेक उच्च शिक्षित लोकांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. ऑनलाईन फसवण्यासाठी सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवत असतात. यामुळेच मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.

किती गुन्हे दाखल झाले पुणे शहरात

पुणे शहरात सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणे 16 टक्क्यांनी वाढले आहे. 2023 च्या आठच महिन्यात सायबर गुन्हेगारीच्या 22 हजार 671 तक्रारी मिळाल्या आहेत. 2022 मधील संपूर्ण वर्षात सायबर गुन्हेगारीच्या 19 हजार 500 तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामुळे सायबर क्राईम किंवा पोलीस विभागांकडून जनजागृती करुन सर्वसामान्य नागरिक फसवले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. फसवणूक झालेल्यामध्ये उच्च शिक्षित लोकांचाही समावेश आहे.

कोणकोणत्या प्रकारने होते फसवणूक

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन फ्रॉड, ओटीपी घेऊन फसवणूक, एटीएम कार्डद्वारे फसवणूक, ऑनालाईन व्यवसायचे लालच देऊन फसवणूक, मल्टी लेव्हल मार्केटींग, सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, हॉकींग करुन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे. 2021 मध्ये 19 हजार, 2022 मध्ये 19 हजार 500 तर 2023 च्या आठ महिन्यांत 22 हजार 671 सायबर गुन्हे दाखल झाले आहे.

हे सुद्धा वाचा

सायबर तज्ज्ञ म्हणतात…

सायबर गुन्हेगारी वाढल्याबद्दल बोलताना सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फसवणूक करत नाही तर विविध योजनांमधूनही फसवणूक करतात. लोकही अशा योजनांच्या आहारी जातात. तसेच पैसे ट्रॅन्सफर करताना सायबर तज्ज्ञ किंवा पोलिसांचा सल्ला घेत नाही. यामुळे सायबर गुन्हेगार त्यांना सहज फसवतात.

सायबर तज्ज्ञ गौरव जाचक म्हणतात, पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांपेक्षा फसवणूक झालेले प्रकार जास्त आहेत. अनेक जणांची फसवणूक 5,000 ते 8,000 दरम्यान झालेली आहे. ही लोक सायबर क्राईम विभागाकडे तक्रार देत नाही. ही रक्कमही लाखोंचा घरात आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.