पुणेकरांनो पाणी जपून वापरा, कारण आता आहे पाणी कपातीचे संकट

पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. यंदा एल निनोमुळे मॉन्सून लांबणीवर पडणार आहे. पुणेकरांनी आतापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन केले नाही तर यंदाचा उन्हाळ्यात पाणी कपात प्रशासनाला करावी लागणार आहे. पाणी वापरताना कटकसर करणे गरजेचे झाले आहे.

पुणेकरांनो पाणी जपून वापरा, कारण आता आहे पाणी कपातीचे संकट
water supply
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 10:40 AM

पुणे : पुणे शहरातील नागरिकांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपातीचे संकट पुणेकरांवर असणार आहे. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकल्पाचा साठा घसरला आहे. यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. यंदा एल निनोमुळे मॉन्सून (Monsoon) लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना आतापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

जलसाठा किती घसरला

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी २१ धरणांमधील जलसाठा घसरला आहे. हा जलसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यांचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात उजनीसह लहान मोठ्या एकूण २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी आहे. यंदा या धरणांमध्ये २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के जलसाठा झाला होता. परंतु पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा शिल्लक आहे.

हे सुद्धा वाचा

पाणीपातळीत वेगाने घट 

पुणे जिल्ह्यातील खडकवासला,चासकमान, वीर, डिंभे, विसापूर, उजनी या धरणांतून पाण्याचा डाव्या, उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या विसर्गाचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याशिवाय खडकवासला, पवना, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर या धरणांतून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे.

कोणत्या धरणात किती साठा शिल्लक

  • टेमघर धरणात ०.४७ टीएमसी म्हणजेच ८ टक्के साठा शिल्लक आहे
  • वरसगाव धरणात ५.७९ टीएमसी म्हणजेच ४५ साठा शिल्लक आहे
  • पानशेत धरणात ५.१९ टीएमसी म्हणजेच ३७ साठा शिल्लक आहे
  • खडकवासला धरणात ०.८४ टीएमसी म्हणजेच ५२ साठा शिल्लक आहे
  • पवना धरणात ३.४७ टीएमसी म्हणजेच ४० साठा शिल्लक आहे
  • कासारसाई धरणात ०.३२ टीएमसी म्हणजेच ४२ साठा शिल्लक आहे
  • कळमोडी धरणात ०.९० टीएमसी म्हणजेच ५७ साठा शिल्लक आहे

हे ही वाचा

Good News : मुंबई- पुणे दरम्यान अंतर कमी करणारी बातमी, कधी सुरु होणार हा प्रकल्प

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, १६० कोटींचा कसा आहे प्रकल्प

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.