Pune Police | गणेशोत्सवात पुणे शहरातील 73 पोलिसांवर मोठी कारवाई, काय आहे कारण

Pune Police | पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाचे नियोजन केले होते. सुमारे सात हजार पोलिसांचा पहारा या काळात ठेवण्यात आला होता. २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष होते. परंतु पुणे पोलीस उपायुक्तांनी 73 पोलिसांवर मोठी कारवाई केली आहे.

Pune Police | गणेशोत्सवात पुणे शहरातील 73 पोलिसांवर मोठी कारवाई, काय आहे कारण
Pune PoliceImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 10:10 AM

पुणे | 28 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात दहशतवादी सापडल्याचा पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव आला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी बंदोबस्ताची मोठी तयारी केली होती. सात हजार पोलीस आणि १८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष होते. यामुळे पुणे शहरातील गणेशोत्सवातील दहा दिवस कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु या दरम्यान ठरवून दिलेल्या कामे योग्य पद्धतीने केले नाही, यामुळे पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस उपायुक्तांनी 73 पोलिसांवर मोठी कारवाई केली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिसांवर कोणत्या प्रकारची कारवाई

पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी एकूण 73 पोलिसांवर केली आहे. तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. 47 पोलिसांची मुख्यालयात बदली केली आहे. तर 23 पोलिसांना प्रत्येकी 2,000 रुपये दंड केला आहे. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. गुरुवारी या पोलिसांनी नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी हे पोलीस उपस्थित नव्हते, यामुळे ही कारवाई केली गेली आहे.

कारवाईसाठी काय आहे कारण

पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाचे नियोजन केले होते. त्यावेळी हे पोलीस कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी आढळले नाही. या पोलीस कर्मचाऱ्यांवर गर्दीचे नियोजन आणि वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी होती. ज्या ठिकाणी त्यांना हे काम दिले होते, त्या ठिकाणी ते गेले नाही. या पोलिसांनी वरिष्ठांना न कळवता उत्सवाच्या काळात आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी गेले नाही, यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

कर्मचाऱ्यांवर दंडाची कारवाई

पोलिसांची यासंदर्भात चौकशी करण्यात आली. या चौकशीत ज्यांची उत्तरे असमाधानकारक नव्हती त्यांना दंड करण्यात आला. तीन जणांनी आपले कर्तव्य बजावले नाही, यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुणे शहरात गुरुवारी पाऊस होता. त्यावेळी रेनकोट परिधान करुन आपले कर्तव्य बजावण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी 28 जिल्ह्यातून 4,200 वाहतूक पोलीस कर्मचारी बोलवले होते. तसेच कंट्रोल रुमही तयार केले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.