Ajit Pawar | अजित पवार पुन्हा आक्रमक, तुम्ही चांगले जेवण देत नाही? असे कोणाला फटकारले

pune jilha madhyavarti sahakari bank | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या सडेतोड स्वभावामुळे चर्चेत असतात. कोणालाही स्पष्टपणे ते बोलत असतात. त्यांना सोमवारी तसाच अनुभव आला. तुम्ही चांगले जेवणे देत नाही, असे स्पष्टपणे त्यांनी सुनावले.

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा आक्रमक, तुम्ही चांगले जेवण देत नाही? असे कोणाला फटकारले
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 3:37 PM

प्रदीप कापसे, पुणे | 18 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी कोणाची मुलाहिजा बोलत असतात. त्यांचे रोखठोक बोलण्यामुळे त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. अधिकारी असो की मंत्रिमंडळातील सहकारी कोणालाही ते सोडत नाही. पत्रकार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खडेबोल सुनावण्यात ते कमी करत नाही. त्यांच्या या स्पष्टवक्तपणाची चर्चा राजकारणात आणि राजकारणाबाहेर होत असते. परंतु सोमवारी त्यांनी पुन्हा जेवणावरुन सुनावले.

काय आहे नेमका प्रकार

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह बँकेचे सर्व संचालक आणि बँकेच्या संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बँकेचा ताळेबंद मांडण्यात आला. बँकेची एकूण व्यावसायिक उलाढाल 19 हजार 454 कोटी रुपयांची आहे. बँकेला गेल्या वर्षात 352 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झालेला आहे. बँकेचा नफा 70 कोटी 70 लाख रुपये आहे. महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनने उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुरस्कार पुणे जिल्हा बँकेला प्रदान केला आहे. या सभेत अजित पवार यांनी बँकेच्या प्रशासनला फटकारले.

अजित पवार यांनी कोणाला सुनावले

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभेत अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. बँक चांगल्या प्रतीचे जेवण देत नाही. जेवण देताना चांगले जेवण द्या. शेतकऱ्यांमुळे बँक आहे, असे स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितले. वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर सभासदांना दिल्या जाणाऱ्या जेवणावरून बँक प्रशासन आणि संचालकांना अजित पवार यांनी खडेबोल सुनावले.

हे सुद्धा वाचा

50 हजारांचे अनुदान देणार

दर आठवड्याला मी आणि दिलीप वळसे पाटील पुण्यात असणार आहे. आम्हाला येऊन भेटा काही काम असेल तर सांगा, असे अजित पवार यांनी सभासदांना सांगितले. आपली बँक चांगली सुरू आहे. इतर बँका अडचणीत आल्या आहेत. आपण नियमाप्रमाणे बँक चालवत असल्यामुळे बँकेची प्रगती चांगली सुरू आहे. सुदैवाने खूप वर्षांनंतर आपल्या जिल्ह्याला दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून सहकार मंत्री लाभले आहेत. आपली बँक साखर कारखान्यांना कर्ज पुरवठ्यामुळे चालत आहे. आता ज्यांनी नियमित कर्ज भरले आहेत, त्यांना 50 हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.