पुण्यात पुन्हा मद्यधुंद कारचालकाचा थरार, मद्याचा नशेत भरधाव गाडी चालवत…
Pune Accident | सांस्कृतिक पुणे शहरात मद्याच्या नशेत वाहन चालवण्याचे प्रकार वाढत आहे. मद्याच्या नशेत कार चालवणाऱ्या चालकाने भरधाव कार चालवून दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुणी हवेत उडली. त्यानंतर जमिनीवर आदळली.
योगेश बोरसे, 16 डिसेंबर | सांस्कृतिक पुणे शहरात “ड्रिंक अँण्ड ड्राईव्ह”चे प्रकार वाढत आहे. गेल्या सहा महिन्यात ड्रिंक अँण्ड ड्राईव्हमुळे अनेक अपघात झाले होते. ऑक्टोंबर महिन्यात एका मद्यधुंद वाहन चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले होते. झेड ब्रिजवर हा अपघात झाला होता. मद्यधुंद वाहन चालक उमेश हनुमंत वाघमारे याने अनेक वाहनांना उडवले होते. आता पुन्हा मद्यधुंद कारचालकाने अपघात घडवला आहे. मद्याच्या नशेत कार चालवणाऱ्या चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना धडक दिली. त्याचा भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार हवेत उडला. त्यानंतर जमिनीवर आदळला. या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघात दुचारीवरील दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
चालकाला केली अटक
पुणे येथील कार चालक अशोक नामदेव मद्याच्या नशेत गुरुवारी रात्री गाडी चालवत होता. पुणे येथील खराडी परिसरात त्याने चार वाहनांना घडक दिली. सोनाली अविनाश रोकडे (२६) आणि तिचा मित्र अभिषेक गायकवाड (२९) दुचाकीवरुन जात होते. या दुचाकीला कारने धडक दिला. त्यात सोनाली हवेत फेकली गेली. त्यानंतर जमिनीवर आदळली. त्यात तिचा मृत्यू झाला. अभिषेक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कारचालक आरोपी भव्य अशोक नामदेव याला पोलिसांनी अटक केलीय. चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोनाली रोकडे एका मेडिकल दुकानात कामाला होती. काम संपल्यानंतर अभिषेक तिला दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.
कोयता गँगची दहशत
पुणे येथील एनडीए रस्त्यावर कोयता गँगची दहशत आहे. उपहारगृहात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम, आदित्य उद्धव पांचाळ, सनी रामप्रताप गुप्ता या तिघांना अटक केली आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्यात कोयता गँग विरोधात पोलिसांकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या कारवाया कमी होत नाही.