लोणावळ्याच्या धबधब्यात वाहून गेलेले अन्सारी अन् सय्यद कुटुंबीय त्या ठिकाणी का आले होते? धक्केत असलेल्या नातेवाईकांनी सांगितले…

lonavala bhushi dam: पुण्यातील हडपसर भागातील खान आणि अन्सारी कुटुंबातील 18 सदस्य हे लोणावळा धरणाच्या पाठीमागे असणाऱ्या भुशी धरणावर वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यातील दहा जण वाहून गेले. तीन जणांचा मृतदेह मिळाला आहेत. रात्री उशिरा शोध कार्यात अडथळे येत असल्याने शोध कार्य थांबवले होते.

लोणावळ्याच्या धबधब्यात वाहून गेलेले अन्सारी अन् सय्यद कुटुंबीय त्या ठिकाणी का आले होते? धक्केत असलेल्या नातेवाईकांनी सांगितले...
lonavala bhushi dam
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 10:22 AM

पावसाळा सुरु होताच पुणे आणि परिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहेत. अनेक पर्यटक पर्यटनासाठी डोंगर, दऱ्या अन् धबधबे असणाऱ्या ठिकाणी जातात. या ठिकाणी धाडस करणे कधी चांगलेच महागात पडते. पुण्याजवळ असणाऱ्या लोणावळ्यामध्ये भुशी डॅम्पच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली. धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरु आहे. वाहून गेलेल्या पाच जणांमध्ये चार अल्पवयीन मुले आहेत.

कशी घडली घटना

लोणावळ्यातील भुशी डॅम्प सध्या ओवरफ्लो झाला आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. रविवारी अन्सारी परिवार भुशी डॅम्पवर पर्यटनासाठी आला होता. जंगलातून येणाऱ्या बॅक वॉटरवरील धबधब्यावर अन्सारी परिवार पाण्याचा आनंद घेत होता. तेव्हा धबधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात दहाजण अडकले होते. त्या पैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

वाहून गेलेल्यामध्ये साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8) यांचा समावेश आहे. या घटनेत त्या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच अदनान अन्सारी (वय- 4), मारिया अन्सारी (वय- 9) या दोघांचा शोध सुरू आहे. लोणावळ्याच्या धबधब्यात वाहून गेलेले अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय त्या ठिकाणी वर्षाविहार करण्यासाठी आले होते.

हे सुद्धा वाचा

घडलेल्या घटनेनंतर धक्का बसलेल्या नातेवाईकांनी ही माहिती दिली. २७ तारखेला लग्न होते. त्यानंतर ३० तारखेला लोणावळ्यात येण्याचा विचार केला आणि ते निघाले. ते एका ट्रेम्पो ट्रॅव्हलमध्ये निघाले होते. एकूण १७ जण होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

दोन कुटुंबातील 17 सदस्य पर्यटनासाठी

पुण्यातील हडपसर भागातील खान आणि अन्सारी कुटुंबातील 17 सदस्य हे लोणावळा धरणाच्या पाठीमागे असणाऱ्या भुशी धरणावर वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यातील दहा जण वाहून गेले. तीन जणांचा मृतदेह मिळाला आहेत. रात्री उशिरा शोध कार्यात अडथळे येत असल्याने शोध कार्य थांबवले होते. उर्वरित दोघांचा मृतदेह आज पुन्हा शोधण्याचे काम सुरू होईल. आता पुन्हा नऊ वाजण्याच्या सुमारास शोधकार्य सुरू करण्यात येत आहे. कुटुंबातील लहान मुलीला पाण्याबाहेर काढले. त्या मुलीला पर्यटक, डॉक्टर जीवनदान दिले.

Non Stop LIVE Update
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.