Pune Fire : पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपनीला आग, 15 महिलांसह 18 जणांचा मृत्यू

Pune Fire : पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपनीला आग लागली यामध्ये 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

Pune Fire : पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपनीला आग, 15 महिलांसह 18 जणांचा मृत्यू
पुण्यातील कंपनीला आग
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 8:25 PM

पुणे : पुण्याच्या मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत 15 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.  Pune fire news Mulashi uravade chemical company svs aqua technologies fire broke out fourteen dead

दुपारी दोनच्या दरम्यान आग लागल्याची माहिती

मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती.

या केमिकल कंपनीत सकाळी 41 कर्मचारी कामासाठी आले होते. या 41 पैकी 17 लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी 15 महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाले, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

कंपनीमध्ये सॅनिटायझर निर्मिती

ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41 कामगार कामावर आले होते. आगीनंतर 17 जण बेपत्ता आहेत. यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.

अग्निशामन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल

पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या  9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली असून कुलिंग काम सुरु असल्याची माहिती आहे.  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख घटनास्थळी दाखल झाले होते.

मृतांमध्ये सर्व महिला

पुण्यातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला लागलेल्या आगीत  18 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 15 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 18 कर्मचारी आग लागली त्यावेळी अडकले होते. त्यामध्ये  15 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या: 

Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती

Pune Fire : सॅनिटायझर कंपनीत 15 महिलांसह 17 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?

Pune fire news Mulashi uravade chemical company svs aqua technologies fire broke out fourteen dead

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.