Pune Crime News | पुणे शहरात धक्कादायक घटना, माजी नगरसेविकेवर अत्याचार

Pune Crime News | पुणे शहरातून धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका माजी नगरसेविकेवर मित्रानेच अत्याचार केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

Pune Crime News | पुणे शहरात धक्कादायक घटना, माजी नगरसेविकेवर अत्याचार
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 12:32 PM

पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली असताना अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. हा अत्याचार एका माजी नगरसेविकेवर तिच्या मित्रानेच केला आहे. या प्रकरणी नगरसेविकेने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मित्र असलेल्या या आरोपीने धमक्या देत पैसेही घेतल्याचा आरोप माजी नगरसेविकेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. पर्वती पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

काय आहे प्रकरण

पुणे येथील माजी नगरसेविका असलेल्या महिलेची सचिन मच्छिंद्र काकडे ( वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) याच्याशी मैत्री होती. त्या मैत्री संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी सचिन काकडे याने देऊन माजी नगरसेविकेवर अत्याचार केला. 2017 पासून आरोपी काकडे याने धमकी देत सातत्याने अत्याचार केला. यामुळे त्या नगरसेविकेने अखेर पर्वती पोलिसांत सचिन काकडे विरोधात गुन्हा दाखल केला.

पैशांची सातत्याने मागणी

आरोपी सचिन काकडे आणि पीडित नगरसेविका हे अनेक वर्षांपासून मित्र होते. त्या महिलेच्या पतीला मैत्री संबंध बाबतची माहिती देईल. तसेच यासंदर्भातील फोटो आणि ध्वनिफित समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी सचिन याने दिली. त्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. दहा लाख रुपये दिल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी सचिन याच्याकडून होत होती.

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांपूर्वी असा घडला प्रकार

सचिन काकडे हा दोन दिवसांपूर्वी त्या माजी नगरसेविका असलेल्या महिलेच्या घरी आला. तिला त्याने सांगितले की, तू दुसरे लग्न केले आहे. परंतु तुझ्यामुळे माझी पत्नी मला सोडून गेली. त्यानंतर त्याने तिला मारहाण केली. सचिन काकडे याच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने पर्वती पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे करत आहेत.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.