Pune Gold Rate | पुण्यात सोन्याच्या दरात किंचीत घसरण, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर
गेल्या काही दिवसांपासून रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांनी आज थोडीशी उसंत घेतली आहे. आज पुण्यात सोन्याच्या दरात किंचीतशी घसरण पहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज पुण्यात सोन्याच्या दरात 10 रुपयांची घसरण झाली आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांनी आज थोडीशी उसंत घेतली आहे. आज पुण्यात सोन्याच्या दरात किंचीतशी घसरण पहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज पुण्यात सोन्याच्या दरात 10 रुपयांची घसरण झाली आहे. आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 48 हजार 800 रुपये आहे. काल हाच दर 48 हजार 810 रुपये इतका होता. (Slight decline in gold prices today in Pune)
यासोबतच 22 कॅरेट सोन्याच्या दरातही 10 रुपयांची घसरण आहे. आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 580 आहे. हा दर काल 45 हजार 590 इतका होता.
चांदीच्या दरातही घसरण कायम
मागच्या काही दिवसांपासून पुण्यात चांदीचा दर सातत्यानं कोसळताना दिसतोय. आज पुण्यात चांदीच्या दरात किलोमागे 500 रुपयांची घसरण पहायला मिळाली. आज पुण्यात एक किलो चांदीचा दर 61 हजार 700 रुपये आहे. काल एक किलो चांदीचा दर हा 62 हजार 200 इतका होता. आज एका दिवसात चांदीचा दर 500 रुपयांनी पडला आहे.
जुलै महिन्यात वाढला सोन्याचा दर
पुण्यात सातत्यानं सोन्याच्या भावात चढ-उतार पहायला मिळतोय. गेल्या महिन्यात 1 जुलैला पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळ 46 हजार 190 होता तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 47 हजार 190 होता. 31 जुलैला हा भाव वाढून 22 कॅरेटसाठी 46 हजार 600 तर 24 कॅरेटसाठी 49 हजार 870 झाला होता. जुलै महिन्यात पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दरानं उच्चांक गाठत 40 हजार 880 रुपयांपर्यंत पोहोचला होता. या महिन्यात सोन्याच्या दरात 5.68 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली.
सोने 50,000 रुपयांपर्यंत जाणार
तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोने 50,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. गुंतवणूकदार YOLO मेटलमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याच वेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने आधीच सोन्यात गुंतवणूक सुरू ठेवली असेल, तर आता ती धारण करणे फायदेशीर ठरू शकते.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.
संबंधित बातम्या :