AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Man Shirt | दीड कोटी रुपयांच्या शर्टसाठी गोल्डमॅनची हत्या, मारेकरी सापडले, पण तो शर्ट लंपास?

अतुलने मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत शुभमला बोलवले. सोबत वडिलांना घेऊन येण्याचे सांगितले. त्याला अपेक्षा होती दत्ता फुगे दीड कोटींचा शर्ट परिधान करुन येतील.

Gold Man Shirt | दीड कोटी रुपयांच्या शर्टसाठी गोल्डमॅनची हत्या, मारेकरी सापडले, पण तो शर्ट लंपास?
पुणे गोल्ड मॅन दत्ता फुगे
| Updated on: Feb 25, 2023 | 6:14 PM
Share

पुणे : जगभरात विविध प्रकारचे छंद असणारे अनेक लोक आहेत. काही जणांना गाड्यांची आवड असते, काही खवय्येगिरीत पुढे असतात. काहींना ऐतिहासिक वस्तू जमवण्याचा छंद असतो तर काहींना चांगले कपडे वापरणे आवडतात. आज तुम्हाला अशा एका व्यक्तीची काहाणी सांगणार आहोत, ज्याची सात वर्षांपुर्वी पुणे शहरात हत्या झाली. तो व्यक्ती गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध होता. त्यांना सोन्याचा वापर करण्याचा छंद होता. त्यामुळेच तब्बल दीड कोटी रुपयांचा सोन्याचा शर्ट त्यांनी बनवला होता. पण या शर्टमुळेच त्याची हत्या झाली. आता हा शर्ट आहे कोणाकडे?

गिनीज बुकात  नोंद

पुणे पिंपरी चिंचवडमधील दत्ता फुगे (Story of Goldman Datta Phuge) २०१२ मध्ये जगप्रसिद्ध झाले होते. कारण ३.६ किलो वजनाचा सोन्याचा शर्ट त्यांनी बनवला होता. त्यावेळी त्याची किंमत दीड कोटी रुपये होती. जगातील हा सर्वात महाग शर्ट होता. त्याची चर्चा जगभर झाली. गिनीज बुकमध्ये या शर्टची नोंद झाली. पुणे येथील रांका ज्वेलर्सकडून दत्ता फुगे यांनी हा शर्ट तयार केला होता. शर्टवर १४ हजारांपेक्षा जास्त सोन्याचे फुल होते. बारीक मखमलीवर एक लाखापेक्षा जास्त स्टार होते.

शर्ट ठरला अडचणीचा

शर्ट बनवल्यानंतर दत्ता फुगे यांच्या अडचणी वाढल्या. त्यांना चोर, गुंडाची भीती सुरु झाली. त्यासाठी २०-२० बॉडीगार्ड ठेवावे लागले. हे बॉडीगार्ड सतत त्यांच्या सोबत असायचे. दत्ता फुगे यांचा वक्रतुंड चिट फंड नावाने कंपनी बनवली होती. या कंपनीविरोधात आर्थिक घोटाळ्याच्या तक्रारी होत्या.

शर्ट बनला हत्येचे कारण

चिंट फंडमध्ये दत्ता फुगे यांना नुकसान होऊ लागले. त्यांच्या कंपनीत पैस जमा करणारे लोक पैसे परत मागू लागले. परंतु फुगे यांना नुकसान होत असल्यामुळे ते पैसे देऊ शकत नव्हते. या सर्व प्रकाराने अतुल मोहिते नाराज होता. त्याने दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम याला जाळ्यात ओढले. अतुलने मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत शुभमला बोलवले. सोबत वडिलांना घेऊन येण्याचे सांगितले. त्याला अपेक्षा होती दत्ता फुगे दीड कोटींचा शर्ट परिधान करुन येतील.

मग काय झाले

गोल्डमॅन दत्ता फुगे वाढदिवसाच्या पार्टीत पोहचले. परंतु शुभमच्या मित्रांनी दत्ता फुगे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. जेव्हा शुभम पार्टीत पोहचला तेव्हा गोल्डमॅन दत्ता फुगे यांची हत्या करणारे अतुल मोहिते व रोहन फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती, चार जण फरार होते. अमोल बल्ली, शैलेश बाल्डे, विशाल पाख्रे, निवरुती वाल्के व प्रमोद धोलपुरिया यांना अटक केली होती. फरारमध्ये मोहिते होता. मोहितेने त्याचे पैस न मिळाल्याने ही हत्या केली होती. त्यामुळे त्याला तो शर्ट मिळण्याची अपेक्षा होती.

तो शर्ट आहे कुठे

दीड कोटींचा शर्टसाठी गोल्डमॅनची हत्या झाली. परंतु हा शर्ट मोहिते यांना मिळालाच नाही. कारण तो शर्ट घालून गोल्टमॅन दत्ता फुगे वाढदिवसाच्या पार्टीत गेले नव्हते. ते साध्या कापड्यांमध्येच गेले होते. परंतु त्या शर्टचा शोध पोलीसही घेऊ शकली नाही. पोलिसांच्या चौकशीत परिवाराने घरी तो शर्ट नसल्याचे सांगितले. तो शर्ट दुरुस्तीसाठी ज्वेलर्सकडे दिल्याचे परिवाराने सांगितले. परंतु ज्वेलर्सकडे तो शर्ट पोहचला नाही. कारण दत्ता फुगे यांनी तो ज्वेलर्सकडे दिलाच नव्हता. या प्रकारास सात वर्षांचा काळ लोटला. परंतु अजूनही तो शर्ट कोणाकडे आहे, त्याचा तपास पोलीस घेऊ शकली नाही. फक्त फुगे यांच्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना शिक्षेपर्यंत नेण्यात पोलीस यशस्वी झाली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.