Ajit Pawar | अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, पुण्यात मोठ्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार चांगलेच कामाला लागले आहेत. अजित पवार यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतली. त्यानंतर पुण्यात आज अतिशय महत्त्वाच्या घडामोडी पार पडत आहेत.

Ajit Pawar | अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, पुण्यात मोठ्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 5:52 PM

अभिजित पोते, Tv9 मराठी, पुणे | 13 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर ते चांगलेच अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर ते पुण्याचे पालकमंत्री होतील, याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण पुण्याचं पालकमंत्रीपद भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांचा अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यास विरोध होता. पण अजित पवार यांचा गट पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होता. त्यामुळे अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. पुण्याच्या पालकमंत्रपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार चांगलेच कामाला लागले आहेत.

अजित पवार यांचा पुण्यात आज सकाळपासून बैठकांचा धडाका सुरु आहे. पुण्यातील सर्किट हाऊस येथे अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका सुरू आहेत. अजित पवार आज सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील सर्किट हाऊस येथे बैठका घेत आहेत. त्यांनी सकाळपासून विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.

अजित पवारांकडून पुणे शहरासह जिल्हाभरातील अनेक कामांचा आढावा घेण्यात आलाय. पुणे शहरातील महानगरपालिका आयुक्तांसह, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांसोबत अजित पवारांनी आढावा बैठक घेतलीय. अजित पवारांच्या सकाळपासून आठ पेक्षा अधिक महत्त्वाच्या विषयांवर बैठका झाल्या आहेत.

अजित पवारांनी आज दिवसभरात घेतलेल्या बैठका खालीलप्रमाणे :

  • पाणी पुरवठा योजनांचा आढावा
  •  पुणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा आढावा
  • जिल्ह्यातील विद्युत पारेषण विभागाच्या बैठका
  • जिल्हा मध्यवर्ती बँकेची महत्त्वाची बैठक
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
  • ७ जिल्हाभरातील विकास कामांचा अजित पवारांकडून आढावा

अजित पवारांना प्रशासन सांभाळण्याचा चांगला अनुभव

अजित पवार यांना प्रशासन सांभाळण्याचा चांगला अनुभव आहे. प्रशासनातील काही गोष्टींमध्ये त्रुटी आढळल्यास अजित पवार हे कॅमेऱ्यासमोर अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. त्यामुळे त्यांच्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये आदरयुक्त भीती आहे. अजित पवार हे सकाळी सात वाजल्यापासून नियमित बैठका घेत असतात. ते आजदेखील तशा बैठका घेत आहेत. त्यांच्या या बैठकांमधून पुणे जिल्ह्यासाठी काही ठोस निर्णय घेण्यात येतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.