Pune, IPL2022 : विराट कोहली, रोहित शर्माला भेटण्याचा मोह महागात, क्रिकेटप्रेमीवर गुन्हा दाखल
आयपीएल 2022चा 15वा सीजन सुरु आहे. पुण्यातील गहुंजे गावात असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर एका क्रिकेटप्रेमीनं विराट कोहली,रोहित शर्माला भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला चांगलंच महागात पडलं.
पुणे : आयपीएल 2022चा (IPL2022) 15वा सीजन सुरु आहे. या आयपीएलच्या सीजनमधील हे सामने महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील (Pune) गहुंजे गावात असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) खेळवले जातायेत. आता आपल्या शहरात खेळाडू क्रिकेटसाठी येत असल्याने क्रिकेट प्रेमींना त्यांना पहावं वाटणारंच. त्यांना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी स्टेडियमवर जातात. अनेक लोक खेळाडूंना बोलण्याचा, त्यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्नही करतात. पण, कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने खेळाडूंना भेटता येत नाही. भेटता काय त्यांच्या थोडंही जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांची यंत्रणा अलर्ट होते आणि परिणामी अटही होऊ शकते. आशातच एक बातमी पुण्याच्या गहुंजे गावात असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरुन समोर आली आहे. यात एका क्रिकेट चाहत्याने थेट विराट कोहलीला भेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काय काय झालं ते वाचा सविस्तर.
विराटला भेटनं पडलं महागात
आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु आहे. यातच महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात सामने खेळवले जातायेत. यातच पुण्यातील गहुंजे स्टेडियमवरील एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. काल गहुंजे स्टेडियममध्ये आयपीएल क्रिकेटचा सामना सुरू असताना 26 वर्षीय दशरथ जाधव या क्रिकेटप्रेमीला मैदानामध्ये जाऊन विराट कोहलीला भेटण्याचा मोह आवरला नाही. विराट कोहलीसमोर दिसताच दशरथने थेट मैदानाच्या सुरक्षारक्षक तार ओलांडून मैदानात प्रवेश केला. दशरथच्या या अचानक प्रवेशाने आणि चोख सुरक्षा व्यवस्था असूनही दशरथ स्टेडियममध्ये आल्याने तेथिल सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी पोलीस आणि स्टेडियम स्टाफ हा दशरथ जाधव याच्या मागे धावू लागला. दशरथ जाधवने विराट कोहलीसोबत हात मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा रोहित शर्माकडे देखील वळवला. मात्र, त्याच वेळी पोलिसांनी दशरथ जाधवला ताब्यात घेतलं. यावेळी दशरथ आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद झाला. दशरथ जाधव पोलिसांच्या अंगावर धालून गेला. याप्रकरणी दशरथ जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांची तारांबळ
काल गहुंजे स्टेडियममध्ये आयपीएल क्रिकेटचा सामना सुरू असताना पोलिसांचा त्याठिकाणी चोख बंदोबस्त होता. पण, तरीही 26 वर्षीय दशरथ जाधव या क्रिकेटप्रेमीला मैदानामध्ये जाऊन विराट कोहलीला भेटण्याचा प्रयत्न केला. दशरथच्या या अचानक प्रवेशाने आणि चोख सुरक्षा व्यवस्था असूनही दशरथ स्टेडियममध्ये आल्याने तेथिल सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी पोलीस आणि स्टेडियम स्टाफ हा दशरथ जाधव यांच्या मागे धावू लागला. दशरथ जाधवने विराट कोहलीसोबत हात मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा रोहित शर्माकडे देखील वळवला. मात्र, त्याच वेळी पोलिसांनी दशरथ जाधवला ताब्यात घेतलं. यावेळी दशरथ आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद झाला. दरम्यान, क्रिकेटप्रेमीवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
इतर बातम्या