AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Rain: पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, प्रचंड वाहतूक कोंडी, मोठा पूर, घरांत पाणी, वाहने गेली वाहून

आळंदी रस्त्यावरील दिघी येथे ढग फुटीसारखा पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाण आले. पाण्याचा प्रवाह एवढा होता की पूर आल्याचे दृश्य दिसत होते. रस्त्याच्या कडेला पार्कींग केलेले वाहने वाहून गेली आहेत. यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे लोकांनी सांगितले आहे.

Pune Rain: पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, प्रचंड वाहतूक कोंडी, मोठा पूर, घरांत पाणी, वाहने गेली वाहून
पुण्याला झोडपलं Image Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 8:48 PM
Share

पुणे – पुणे शहराला (Pune) मुसळधार पावसाने (rain)चांगलंचं झोडपून काढलेलं आहे. या मुसळधार पडलेल्या पावसानं कात्रज ते नवले ब्रिज या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यानं त्याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी (traffic jam) या मार्गावर आहे. त्यातच आज रविवार असल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झालेली आहे. संध्याकाळच्या सुमारास या भागात वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळत होते. एका अँम्बुलन्सलाही आज वाट काढताना कसरत करावी लागली.

पुण्यात  चंदननगर पोलिस स्टेशन, वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड, लमाण तांडा, पाषाण, सोमेश्वर वाडी, पाषाण, वानवडी, शितल पेट्रोल पंप, बी टी ईवडे रोड, काञज उद्यान या आठ भागात पाणी शिरले आहे. तर एनसीएल जवळ पाषाण, साळुंखे विहार, कोंढवा,  ज्योती हॉटेलजवळ कोंढवा, चव्हाणनगर, रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन या ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

कात्रज ते नवले ब्रिज या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे. संध्याकाळच्या सुमारास या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसाचा फटका पुणेकरांना सहन करावा लागतोय.

सुसगाव आणि महादेवनगरचा संपर्क तुटला

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याजवळील सुसगाव आणि महादेवनगर मधील संपर्क तुटला आहे. रस्तावर पाणी आल्याने एक रिक्षा आणि दुचाकी वाहून गेली आहे. पुण्यात मुसळधार पावसाने चांगलीच वाताहात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यात आळंदी रस्त्यावर ढगफुटीसारखा पाऊस

आळंदी रस्त्यावरील दिघी येथे ढग फुटीसारखा पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाण आले. पाण्याचा प्रवाह एवढा होता की पूर आल्याचे दृश्य दिसत होते. रस्त्याच्या कडेला पार्कींग केलेले वाहने वाहून गेली आहेत. यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे लोकांनी सांगितले आहे.

आंबिल ओढ्याला मोठा पूर

रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कात्रज धनकवडी परिसरासह पर्वती भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आहे, थील 11 ते 12 घरांत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओढ्याचे पाणी शिरले आहे.पुण्यातील आंबील ओढ्या नजीक नजीक असलेल्या वसाहतीत पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक घरातील गॅस,सिलेंडर, फ्रीज आशा उपयोगी वस्तू पाण्यात गेल्याने मोठे नुकसान

मुसळधार पावसामुळे सिंहगडाच्या पायथ्याशी रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत.  ऐतिहासिक सिंहगडाच्या पायथ्याला  आतकरवाडी इथं भर पावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागलेत.  शासनाच्या उदासीनपणामुळे स्मशानभूमीला अद्यापही जागा नाही.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.