Pune News : परवडणाऱ्या शहरात पुणे कितव्या क्रमांकावर, मुंबई किती आहे स्वस्त
Pune News : देशात सर्वाधिक महाग शहर कोणते असणार? तसेच सर्वात किफायतशीर शहर कोणते? अशी चर्चा नेहमी होत असते. आता देशातील सर्वात महाग शहर कोणते अन् परवडणारे शहर कोणते याची माहिती समोर आली आहे.
पुणे | 17 ऑगस्ट 2023 : देशातील मेट्रो शहरांची नेहमीच चर्चा होत असतो. या शहरांमध्ये तयार झालेल्या पायाभूत सुविधांचे आकर्षण इतर शहरांना असते. कोणत्या शहरात रोजगाराच्या संधी जास्त आहेत, कुठे उद्योग जास्त आहे, यासंदर्भात राजकीय चर्चाही रंगते. आता देशात किफायतशीर शहर कोणते आहे? यासंदर्भातील अहवाल समोर आला आहे. पुणे आणि मुंबई शहर परवडणाऱ्या घरांमध्ये कितव्या क्रमांकावर आहेत? हे ही यानिमित्ताने पुढे आले आहे.
पुणे शहर कितव्या क्रमांकावर
देशातील शहरात 2023 मध्ये पहिल्या सहा महिन्यांचा अहवाल नाईट फ्रँक या संस्थेने दिला आहे. या सहा महिन्यात परवडणारे शहर कोणते आहे, त्याचे उत्तर मिळाले आहे. ॲफ्रेडेबल इंडेक्समध्ये अहमदाबाद शहराने बाजी मारली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर आहे. म्हणजे पुणे शहर परवडणाऱ्या शहरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्पन्न आणि ईएमआयचे गणित या विषयांची सांगड घालत आठ शहरांची यादी तयार केली आहे. मुंबई हे शहर सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.
ईएमआयचे गणित
देशातील आठ शहरांचे ईएमआयचे गणित मांडण्यात आले आहे. अहमदाबाद २३ टक्के तर पुणे २६ टक्क्यांवर आहे. पुण्याबरोबर कोलकोता शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि बंगळुरु २८ टक्क्यांवर आहे. दिल्ली २३ तर हैद्राबाद ३१ टक्क्यांवर आहे. सर्वाधिक ईएमआयचा दर मुंबईत तब्बल ५५ टक्के आहे. यामुळे सर्वात महाग शहर मुंबईला म्हणता येईल.
पुण्यात कमी ईएमआय
पुणे शहरात पायाभूत सुविधा चांगल्या निर्माण झाल्या आहेत. पुणे शहरातील वातावरण चांगले आहे. आता पुण्यात प्रदूषणाची पातळी वाढली असली तरी सकाळी आणि संध्याकाळी वातावरण थंड असते. पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. पुण्यात रोजगाराच्या संधी मुबलक आहे. त्या तुलनेत घरे किंवा इतर सुविधांसाठी ईएमआय कमी आहे. यामुळे देशात सर्वात स्वस्त शहरामध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.