AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे कसबा पेठ, पिंपरी चिंचवडमधील भाजप उमेदवार जाहीर, वाचा कोणाला मिळाली उमेदवारी

कसबा मतदार संघातून टिळक यांच्या परिवारातून उमेदवारी दिली नाही तर पिंपरी चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातून उमेदवारी दिली आहे. कसबा पेठमध्ये हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे

पुणे कसबा पेठ, पिंपरी चिंचवडमधील भाजप उमेदवार जाहीर, वाचा कोणाला मिळाली उमेदवारी
| Updated on: Feb 04, 2023 | 1:10 PM
Share

पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड व कसबा विधानसभेची (kasba and pimpri chinchwad bypoll election) पोटनिवडणूक २६ फेब्रवारी रोजी होणार आहे. यासाठी भाजपने दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत. कसबा मतदार संघातून टिळक यांच्या परिवाराला उमेदवारी दिली नाही तर पिंपरी चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातून उमेदवारी दिली आहे. कसबा पेठमध्ये हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. टीव्ही ९ ने हेमंत रासने यांना उमेदवारी मिळणार असल्याची बातमी शुक्रवारीच दिली होती. पिंपरी चिंचवडमधून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक (Kunal Tilak) यांना प्रदेश प्रवक्ते केले. खरंतर गेल्या महिन्यात भाजपचे प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली होती.भारतीय जनता पक्षाने नवीन यादीत कुणाल यांच्या नावाची भर घालून ती पुन्हा प्रसिद्ध केली. यामुळे भाजपचा उमेदवार टिळक परिवारातील नसणार का? ही चर्चा सुरु होती. त्यानुसार टिळक परिवारात उमेदवारी देण्यात आली नाही.

कोण आहेत हेमंत रासने

हेमंत रासने हे पुणे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्ता म्हणून संधी मिळाली. सर्वांच्या अपेक्षा आपण पुर्ण करणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

जबाबदारी वाढली

भाजपमध्ये गटातटाचे राजकारण नसते. पक्ष ठरवते, त्याप्रमाणे कार्यकर्ते काम करतात. नगरसेवक म्हणून १२ ते २० वर्षांपासून काम करताना आता राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली, यामुळे आता जबाबदारी वाढली असे हेमंत रासने यांनी सांगितले.

टिळक कुटुंबीयांशी चर्चा करुन निर्णय

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टिळक कुटुंबीयांशी चर्चा करुन कसबा पेठेतील उमेदवार ठरवल्याचे सांगितले. आता कुणाल टिळक यांच्यांवर नवीन जबाबदारी देण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.

आघाडीचे उमेदवार जाहीर

काँग्रेसकडून कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडची जागा शिवसेनेला लढायची होती. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने या जागेचा हट्ट सोडला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.