पुणे कोयता गँगने पुन्हा डोकेवर काढले, तरुणाचा मनगटापासून पंजा तोडला

पुणे पोलिसांनी कोयता गँगविरोधात धडक मोहीम सुरु केली होती. त्यानंतर कोयता गँगचा उपद्रव कमी होत नाही. पुणे शहरातील नागरीक दहशतीखाली आहे. आता पुण्यात भरदिवसा तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्लाखोर प्रसार झाले आहेत.

पुणे कोयता गँगने पुन्हा डोकेवर काढले, तरुणाचा मनगटापासून पंजा तोडला
crime newsImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 7:52 AM

योगेश बोरसे, पुणे : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांच्या (Crime News) धडक कारवाया सुरु आहेत. परंतु त्यानंतर गँगची दहशत कमी झालेली नाही. पुणे पोलिसांनी काही जणांवर मकोका लावला आहे. काही जणांना हद्दपार केले आहे. कोयताची विक्री करताना आधारकार्डची सक्ती केलाय. या सर्व उपायानंतरही कोयता गँगने डोकेवर काढले आहे. त्यांची अजूनही शहरात दहशत आहे. पुणे शहरातील हल्ले कमी होत नाही. कोयता गँगचा धुमाकूळ शाळा, महाविद्यालयांपर्यंत पोहचला आहे. आता एका तरुणाचा मनगटापासून पंजा तोडण्याचा प्रकार भर दिवसा घडला आहे आहे.

नेमके काय घडले

पुणे शहरातील कोयता गँगची चर्चा राज्यभरात सुरु आहे. या कोयत्या गँगच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचे प्रयत्न अपूर्ण पडत आहे. आता पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाचा मनगटापासून पंजा तोडला गेला आहे. पुण्यातील कात्रज भागात भर दिवसा हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अखिलेश चंद्रकांत कलशेट्टी या तरुणाचा कोयत्याने वार करुन पंजा तोडला गेला आहे. सुदैवाने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला. याप्रकरणी अभिजीत दुधनीकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ५-६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा हा ही प्रयोग

भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2022 मध्ये 303 गुन्ह्यांत 476 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापैकी 42 मुलांचा मागे कोणत्या अन् कोणत्या गुन्हेगारांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे या मुलांवर दाखल होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.